Earthquake in Delhi: दिल्लीत भूकंपाचे धक्के, 5.8 रिश्टर स्केलची तीव्रता; केंद्र अफगाणिस्तानत

Delhi News: दिल्लीत भूकंपाचे धक्के, 5.8 रिश्टर स्केलची तीव्रता; केंद्र अफगाणिस्तानत
Earthquake in Delhi
Earthquake in DelhiSaam Tv
Published On: 

Earthquake in Delhi: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्लीत रात्री 9.34 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात होता. जम्मू-काश्मीरमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Earthquake in Delhi
Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी

याआधी आज पहाटे जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये 5.2 रिश्टर स्केलचे भूंकपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) सकाळी 8:36 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू गुलमर्गपासून 184 किमी अंतरावर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 129 किमी खाली होता.

एक अहवालानुसार, या वर्षी जूनपासून जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेचे 12 भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 10 जुलै रोजी सकाळी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात 4.9 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.  (Latest Marathi News)

Earthquake in Delhi
Devendra Fadnavis News: ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भूकंप झाल्यास काय करावे आणि काय करू नये?

भूकंप झाला की अनेकदा आपण घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करतो, पण इतक्या घाईत ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा भूकंप होतो आणि तुम्ही घरी असाल तर जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करा. जवळपास एखादे टेबल किंवा फर्निचर असल्यास त्याखाली बसून आपले डोके हाताने झाकून घ्यावे.

या दरम्यान घरातच राहा आणि बाहेर पडू नका. सर्व विद्युत स्वीच बंद करावेत. तुम्ही घराबाहेर असाल तर उंच इमारती आणि विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.