जगातील अनेक देशात भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांचे सर्वाधिक नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. या दुर्घटनेत तब्बल २ हजार लोकांचा मृत्यू झाला. तर जखमी होणाऱ्यांची संख्या देखील हजारोंच्या घरात आहे. दरम्यान अफगाणिस्तान आता परत एकदा भूकंपाने हादरले आहे. (Latest News)
या भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टेर स्केल नोंदवली गेली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (युएसजीएस) नुसार, अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाचे केंद्र हे राजधानी हेरातपासून ३४ किलोमीटरच्या दूर आहे. जमिनीच्या ७ ते ८ किलोमीटर खोल हे केंद्र होते. हा भूकंप जागतिक वेळेनुसार, ०३.३६ वाजता आला होता. येथील नागरिकांना साधरण २० मिनिटापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.
दरम्यान अफगाणिस्तानमध्ये बहुतेकवेळा शक्तीशाली भूकंप आले आहेत. परंतु अफगाणिस्तानमध्ये इतक्या प्रमाणात भूकंप का येत आहेत. याचे सर्वात मोठं कारण म्हणजे अफगाणिस्तान हे युरेशियन प्लेटच्या दक्षिणी सीमेजवळ आहे. यामुळे भूकंपाचे केंद्र स्थान अफगाणिस्तान असते. तसेच हा परिसर डोंगराळ भागाचा आहे. यामुळे येथे जास्त नुकसान होत असते.
भौगोलिक स्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये भूकंप येत असतात. संपूर्ण दक्षिण आशिया भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे, असे अनेक भूवैज्ञानिक आणि तज्ज्ञांचे मत आहे. एक टेक्टोनिक प्लेट ही उत्तर दिशेला असलेल्या युरेशियन प्लेटकडे सरकत आहे. यामुळे अफगाणिस्तान, भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.