Earthquake Phone Alert: भूकंप येण्याआधीच Android फोनवर मिळणार अलर्ट, 'या' कामाच्या फीचरबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

Google's Earthquake Detection System: भूकंप येण्याआधीच Android फोनवर मिळणार अलर्ट, 'या' कामाच्या फीचरबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
Android Earthquake Alert System1
Android Earthquake Alert System1Saam Tv
Published On

Google's Earthquake Detection System:

आता तुमचा Android फोन तुम्हाला भूकंप येण्यापूर्वीच अलर्ट करेल जेणेकरून तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी वेळीच पावले उचलू शकाल. भारतातील अँड्रॉइड फोन युजर्सला हे उपयुक्त फीचर मिळणार आहे. खरंच भूकंप ही जगातील सर्वात सामान्य नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. लोकांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात मदत करण्यासाठी लवकर अलर्ट मिळणं महत्वाचं ठरू शकतं.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NSC) यांनी आज भारतात अँड्रॉइड भूकंप अलर्ट सिस्टीम सादर केली आहे. भूकंपाचे हादरे ओळखण्यासाठी आणि त्याचा अंदाज घेण्यासाठी ही सिस्टीम Android स्मार्टफोनमधील सेन्सर वापरते. भूकंप येण्यापूर्वीच लोकांना सावध करता यावे यासाठी ही यंत्रणा जगभरातील अनेक देशांमध्ये आधीच कार्यरत आहे.

Android Earthquake Alert System1
Cheapest Hybrid Cars: 'या' आहेत भारतातील 5 सर्वात स्वस्त हायब्रीड कार, देतात जबरदस्त मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अँड्रॉइड फोनच्या पॉवरवर चालते ही सिस्टीम

प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोन एका लहान Accelerometer ने सुसज्ज असतो, जो मिनी सिस्मोमीटर म्हणून कार्य करू शकतो. जेव्हा फोन प्लग इन केला जातो आणि चार्ज होतो, तेव्हा तो भूकंपाचे धक्के ओळखू शकतो. एकाच वेळी अनेक फोन्सने भूकंपाचे वेव्ह्स पकडल्यास, सर्व्हर भूकंप केव्हा येऊ शकतो, याचा अंदाज घेण्यासाठी या माहितीचा वापर करू शकतो. (Latest News on Politics)

कसं काम करेल ही सिस्टीम

Android Earthquake Alert System1 भारतातील सर्व Android 5+ युजर्ससाठी येत्या आठवड्यात उपलब्ध होईल. भूकंपाबद्दल अलर्ट मिळवण्यासाठी युजर्सकडे वाय-फाय किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. तसेच फोनमध्ये Android भूकंप अलर्ट आणि लोकेशन सेटिंग्ज दोन्ही अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. जे युजर्स हे अलर्ट प्राप्त करू इच्छित नाहीत ते डिव्हाइस सेटिंग्जमध्ये भूकंपाचा अलर्ट बंद करू शकतात.

Android Earthquake Alert System1
Mini Electric Car: मिनी पण जबरदस्त; टू-डोअर इलेक्ट्रिक कार अवघ्या 3.47 लाखात लॉन्च; एका चार्जमध्ये मुंबई-पुणे 4 फेऱ्या मारता येतील...

जेव्हा लोक 'Earthquake near me' सारख्या प्रश्नांसह माहिती शोधतात तेव्हा ही सिस्टीम स्थानिक भूकंपाच्या घटना आणि Google सर्चद्वारे सुरक्षा उपायांबद्दल माहिती देखील देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com