Monsoon Update : आनंदवार्ता! ४ दिवस आधीच मान्सून येणार, कोकणात कधी दाखल होणार? अधिकृत तारखा आल्या समोर

Maharashtra Monsoon Update news : भारतामध्ये यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता असून १६ मेपासून अंदमान-निकोबार भागात सक्रिय होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात ६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल.
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon UpdateSaam Tv
Published On
Summary
  • यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची शक्यता

  • १६ मेपासून अंदमान भागात सक्रिय होणार

  • कोकणात ६ जूनपासून पावसाचा अंदाज

  • एल निनोमुळे हवामानात बदल दिसून येणार

देशातील हवामान यंदा सातत्याने बदलताना पाहायला मिळतं आहे. मात्र आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १६ मे पर्यंत भारतात मान्सून दाखल होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत असताना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनच्या सुरुवातीला देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मान्सून यंदा २५ मे च्या सुमारासच केरळमध्ये पोहोचू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्याआधीच १६ मे रोजी तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon Update
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या हालचालींमध्ये बदल होत असून, यंदा तो लवकर येण्याचे संकेत आहेत. तसेच, IMD च्या अंदाजानुसार, अनुकूल हवामानामुळे मान्सून ६ जून रोजी कोकणात दाखल होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोकणकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra Monsoon Update
Shocking : राजधानी हादरली! धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, चालक आणि कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

उत्तर भारतातही काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबतच हिमवृष्टीचीही शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच, बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असून, पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com