

फ्रान्समध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी भारताच्या समर्थनार्थ महत्वाचे विधान केले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाला तर अमेरिका भारताच्या मदतीसाठी त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहील, असा शब्द ट्रम्प यांनी दिला. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुकही केले. पंतप्रधान मोदी दिसायला अगदी शांत आहेत, पण चर्चा करताना ते कठोर असतात, असं ट्रम्प म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. मोदी खूपच कठोर नेते आहेत, पण तितकेच चांगले देखील आहेत, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी ट्रम्प यांनी मोदींच्या स्वभावाचा उल्लेख केला. मी पंतप्रधान मोदींसारखा संयमी, शांत आणि जबरदस्त नाही. पण जरा त्यांच्याकडे बघा, असं ते म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगती करत राहणार आहे. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत भारत खूपच प्रगती करेल, असेही ट्रम्प म्हणाले.
यावेळी ट्रम्प यांनी इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांकडेही लक्ष वेधले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा शेवट बघायचा आहे. मी आठ युद्ध थांबवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे, असा पुनरूच्चारही त्यांनी केला. इराणवर त्यांनी हल्लाबोल केला. इराणने ४८ वर्षे जगभरातील देशांचा गैरफायदा घेतला आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. हॉर्मुझमधील नाकाबंदीमुळं जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम आणि भारतीय खलाशांवरील हल्ल्याचाही मुद्दा मोदींनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.