Mobile Gaming Apps: सावधान! तुम्ही Ludo King आणि Candy Crush गेम खेळताय? मग ‘ही’ बातमी वाचाच...

Gaming Apps Data Privacy: तुम्ही सुद्धा मोबाईलमध्ये हे गेम खेळत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.
Ludo King and Candy Crush games apps
Ludo King and Candy Crush games appsSaam TV
Published On

Smartphone Gaming Apps: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकाकडे एकापेक्षा एक स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोन उपयोग अनेकजण गेम खेळण्यासाठी करतात. सध्या तरुणांसह महिलांना देखील Candy Crush आणि Ludo King गेम खेळण्याचं व्यसन जडलं आहे. अशातच तुम्ही सुद्धा मोबाईलमध्ये हे गेम खेळत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. (Latest Marathi News)

Candy Crush आणि Ludo King हे गेम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. हे गेमिंग Apps वापरकर्त्यांच्या फोनमधील 32 पैकी 17 डेटा पॉईंट्समधून डेटा ऍक्सेस करतात.

Ludo King and Candy Crush games apps
Education Loan: CIBIL Score कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही; हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

यामध्ये फोटो आणि व्हिडिओ तसेच संपर्क माहिती, वारकर्त्याचे स्थान आणि संपर्क समाविष्ट आहेत. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे, की 50 पैकी 38 गेमिंग Apps असे आहेत जे यूजर्सचा डेटा थर्ड पार्टी जाहिरातींना शेअर करतात. (Breaking Marathi News)

या यादीत Ludo King, Candy Crush आणि Subway Surfers यासारख्या अॅप्सचा समावेश आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की 60 देशांमधील 50 सर्वात लोकप्रिय गेमिंग Apps सर्वात जास्त डेटा खातात.

सर्फशार्कने 60 देशांमधील 50 सर्वाधिक लोकप्रिय Apps वर विशेष अभ्यास केला. यासाठी सर्फशार्कने गेमच्या डेटा कलेक्शनच्या सवयी समजून घेण्यासाठी एक अनोखी मापन प्रणाली तयार केली. यामध्ये गेमला डेटा ऍक्सेसनुसार गुणही देण्यात आले होते.

Ludo King and Candy Crush games apps
Maharashtra SSC Result 2023: दहावी परीक्षेचा निकाल कधी? समोर आली मोठी अपडेट

यामध्ये युजर्सच्या ओळखीशी लिंक न करण्यासाठी 1 पॉइंट आणि युजर्सच्या ओळखीशी डेटा लिंक करण्यासाठी 2 पॉइंट देण्यात आले होते. त्याच वेळी, एजन्सीने अॅप आणि वेबसाइटवर वापरकर्त्याचा मागोवा घेणाऱ्या Apps ला 3 गुण दिले गेले.

अभ्यासानुसार, जगातील सहाव्या क्रमांकाचा लोकप्रिय गेम, Subway Surfers चा डेटा हंगर इंडेक्स 57.6 आहे. अहवालात असे म्हटले आहे, की हे गेमिंग Apps कोर्स लोकेशनसह 12 डेटा पॉइंट्सवरून डेटा गोळा करते.

त्याचप्रमाणे, भारतातील गोपनीयतेसाठी असुरक्षित खेळांच्या यादीत लुडो किंगला 38 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. हे खरे आहे की काही गेम योग्यरित्या कार्य करण्यासाठी काही डेटा ऍक्सेस करणे आवश्यक आहे, परंतु येथे वापरकर्त्यांनी देखील सतर्क राहून गेम फोनवर कोणता डेटा ऍक्सेस करत आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com