Education Loan: CIBIL Score कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही; हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

Kerla High Court On Education Loan: फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे महत्वाचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात दिले.
Kerla High Court On Education Loan
Kerla High Court On Education LoanSaam TV
Published On

Kerla High Court On Education Loan: आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना भविष्यात या देशाचे नेतृत्व करायचे आहे. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे महत्वाचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात दिले. (Latest Marathi News)

न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांनी एका प्रकरणाची सुनावणी घेताना हे महत्वाचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी बँकांनी मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असंही न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांनी म्हटलं आहे.

Kerla High Court On Education Loan
Rajasthan High Court: व्यक्तिमत्व आणि शारीरिक रचनेनुसार प्रत्येकाला लिंग बदलण्याचा अधिकार; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

या प्रकरणातील याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेकडे कर्जासाठी (Education Loan) अर्ज केला होता. मात्र, आधी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा 16,667 रुपयांचा हप्ता थकीत असल्याने बँकेने त्याला तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे, असं म्हणत कर्ज देण्यास नकार दिला.

याविरोधात विद्यार्थ्याने कोर्टात (High Court) धाव घेतली. विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज नाही मिळाले तर त्याचे मोठे नुकसान होईल, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे हे शैक्षणिक कर्ज नाकारण्याचे कारण असू शकत नाही, कारण कर्जाची परतफेड विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर केली जाते, असंही याचिकाकर्त्याच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं.

याचिकाकर्त्याला एका कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. या नोकरीच्या आधारावर तो घेतलेल्या कर्जाच्या रकमेची पुढे परतफेड करेल, असा विश्वासही याचिकाकर्त्याच्या वकिलांनी कोर्टाला दिला. (Breaking Marathi News)

दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज देण्याचे निर्देश कोर्टाने संबंधित बँकेला दिले आहेत. त्याचबरोबर या कर्जाच्या रकमेची वेळवर परतफेड करा, असंही कोर्टाने याचिकाकर्त्याला सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com