Maharashtra SSC Result 2023: दहावी परीक्षेचा निकाल कधी? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Board Results 2023 Date: नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे.
Maharashtra SSC Result 2023
Maharashtra SSC Result 2023Saam TV
Published On

Maharashtra Board Results 2023 Date: नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विद्यार्थी तसेच पालकांकडून प्रश्न विचारले जात आहेत. अशातच दहावी परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

Maharashtra SSC Result 2023
Education Loan: CIBIL Score कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही; हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार १० शाळांतून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. (Breaking Marathi News)

दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार?

सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार दहावी परीक्षेचा (SSC Exam) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकालाबाबत बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र यासंबंधीची घोषणा आज बोर्डाकडून केली जाऊ शकते असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान हा निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.

Maharashtra SSC Result 2023
Rajasthan High Court: व्यक्तिमत्व आणि शारीरिक रचनेनुसार प्रत्येकाला लिंग बदलण्याचा अधिकार; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

दहावी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. येथे विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com