Delimitation Bill : DMK डिलिमिटेशनला पाठिंबा देणार का? भाजप सरकारपुढे ठेवल्या 'या' अटी

Delimitation Bill DMK News : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर DMK पक्ष सकारात्मक असल्याचे संकेत. एम. के. स्टॅलिन यांच्या मागण्या, तामिळनाडूचे 7.18 टक्के प्रतिनिधित्व आणि लोकसभेच्या 850 जागांच्या प्रस्तावाबाबत जाणून घ्या सविस्तर.
DMK chief MK Stalin and the Centre's revised Delimitation Bill
DMK chief MK Stalin and the Centre's revised Delimitation Bill AI image
Published On: 

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता तामिळनाडूमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला (Delimitation Bill) DMK पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पक्षप्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी मांडलेल्या मागण्यांचा विचार केल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी संकेत दिले आहेत.

इंडिया टुडेशी बोलताना DMK च्या नेत्यांनी केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले. दरम्यान विधेयकाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारला असता, 'तशी शक्यता दिसत आहे,' असे उत्तर देण्यात आले. मात्र, पक्षाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभेच्या जागांमध्ये वाढ करताना तामिळनाडूचे सध्याचे 7.18 टक्के प्रतिनिधित्व कायम ठेवावे, अशी मागणी एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. तसेच 1971 च्या जनगणनेनुसार राज्यांना मिळालेल्या जागांचे प्रमाण आणखी 25 वर्षे कायम ठेवावे, अशीही त्यांची भूमिका आहे.

DMK chief MK Stalin and the Centre's revised Delimitation Bill
Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

केंद्र सरकारचा प्रस्ताव काय?

केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ करण्याची योजना आहे. मात्र, प्रत्येक राज्याला सध्या मिळत असलेल्या जागांच्या प्रमाणातच वाढ केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याचे लोकसभेतील सध्याचे प्रमाण कमी होणार नाही, असा सरकारचा दावा आहे. या बदलामुळे लोकसभेची कमाल सदस्यसंख्या 850 पर्यंत पोहोचू शकते. महिला आरक्षण कायद्याची 2029 पासून अंमलबजावणी करण्याच्या योजनेशीही हा प्रस्ताव जोडलेला आहे.

DMK chief MK Stalin and the Centre's revised Delimitation Bill
Driving Licence : ५ वेळा वाहतूक नियम मोडला तर ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाहा सविस्तर

या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला संसदेतील दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. द्रमुकचे लोकसभेत 22 खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात द्रमुक नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.