महिला IAS अधिकाऱ्याचा प्रशासकीय सेवेला रामराम; १३ वर्षांनंतर अचानक राजीनामा, कारण काय?

Divya Mittal Resigns : IIT दिल्ली आणि IIM बंगळुरूमधून शिक्षण घेतलेल्या IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी १३ वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आली आहे.
Divya Mittal Resigns
Divya Mittal ResignsDivya Mittal
Published On

Divya Mittal IAS resignation : आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरूमधून शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत आलेल्या प्रसिद्ध महिला आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल १३ वर्षांच्या यशस्वी आणि उल्लेखनीय सेवेनंतर त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक भावुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्या निर्णयावर आणि सेवेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिव्या मित्तल यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. एक सामान्य कुटुंबातून येत त्यांनी आयआयटी आणि आयआयएम सारख्या देशातील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण घेतले. यानंतर त्यांना लंडनमध्ये उच्च पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र, आपल्या देशाची माती आणि देशसेवेचे ऋण फेडण्याच्या ध्येयाने त्यांनी परदेशातील ती आलिशान नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि त्या 'आयएएस' (IAS) अधिकारी बनल्या.

Divya Mittal Resigns
IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

आपल्या १३ वर्षांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी लिहिले की, देवरिया आणि मिर्झापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये काम करताना त्यांना खूप काही शिकायला मिळाले. "देवरियाने मला योग्य गोष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला शिकवले, तर मिर्झापूरने हे दाखवून दिले की 'अशक्य' अशी कोणतीच गोष्ट नसते. सर्वात मोठे समाधान मला तेव्हा मिळाले जेव्हा एखाद्या गरिबाला जमिनीचा हक्क मिळाला, दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगता आले आणि शेतकऱ्याच्या शेताला पाणी पोहोचले," असे त्यांनी नमूद केले.

Divya Mittal Resigns
१६ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

पद सोडले असले तरी स्वप्न सोडलेले नाही

मिर्झापूरमधील लहुरिया दह या पहाडी गावात जेव्हा पहिल्यांदा पिण्याचे पाणी पोहोचले, तेव्हा एका वृद्ध महिलेने कांपत्या हातांनी आपल्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, अशी आठवण त्यांनी व्यक्त केली. "आज माझे पद सुटले आहे, पण त्या वृद्ध माऊलीचा स्पर्श आणि या देशाच्या मातीने मला दिलेले स्वप्न मी कधीही सोडणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिव्या मित्तल यांच्या या तडकाफडकी राजीनाम्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भविष्यात त्या काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com