देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारलं असून चलो दिल्लीचा नारा दिला आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारपासून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या सर्व राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच ठिकठिकाण बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त देखील ठेवला आहे. अशातच पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरजवळ शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली आहे.
या झटापटीचा व्हिडीओ देखील समोर आलाय. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शंभू बॉर्डरजवळ रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बॅरिकेट्स तोडण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)
शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे शंभू बॉर्डवर धुराचे लोट दिसून येत होते. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट देखील झाली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यात यावी, ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी आहे.
सरकारने शेतकऱ्यांची सर्व सरकारी व निमसरकारी कर्जे माफ करावी, अशी देखील शेतकरी नेत्यांची आहे.
केंद्र सरकारने लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन मिळावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
कृषी माल, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला आणि मांसावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी भत्ता वाढवला, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
याशिवाय शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या खासगीकरणावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना किमान 700 रुपये प्रतिदिन वेतन मिळावे आणि वर्षातून किमान 200 दिवस रोजगार मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.