देशभरात सध्या सोशल मीडियावर 'दिमागी नक्षल जनता पार्टी' या नावाच्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटची जोरदार चर्चा सुरू झालीय... 'कॉकरोच जनता पार्टी' नंतर आता या नव्या हँडलने अवघ्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केलाय..मात्र सोशल मीडियावर खळबळ उडवून देणारी ही दिमागी नक्षल पार्टी पंतप्रधानांच्या एका विधानानंतर सुरु झालीय... पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते ऐका....
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधान केलं... ज्यानंतर "I am proud to be a dimagi naxal" असे म्हणत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात निशाणा साधला...ज्यानंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टी नावानं अकाऊंट सुरु झालं...आणि या पार्टीनं 24 तासाताच देश ढवळून निघाला...
दिमागी नक्षल जनता पार्टीचे इंस्ट्राग्रामवर 2 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत
ऑगस्ट 2026मध्येच हे इंस्ट्राग्राम खातं तयार करण्यात आलंय
दिमागी नक्षल पार्टीच्या अकाऊंटवरून राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांसारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना फॉलो करण्यात आलयं..
हँडलच्या बायोमध्ये "Think, Research, Resist" अशी घोषणा लिहिण्यात आलीय
मात्र दिमागी नक्षल पार्टीचं हे खातं नेमकं कोण चालवतय, याची कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही
मोदींच्या या दिमागी नक्षल विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. एकीकडे सोशल मीडियावर तयार झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टीनं नीट प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली.... अशात 'दिमागी नक्षल पार्टी' नावाच्या या इंस्टाग्राम हँडलने डिजिटल माध्यमातून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ माजलीय...आता दिमागी नक्षल पार्टी देशातील कोणत्या मुद्द्याला हात घालते? आणि सत्ताधाऱ्यांना कसं घेरते याबाबत उत्सुकता ताणली गेलीय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.