हा जल्लोष आहे... देशातील तरुणाईच्या विजयाचा... हा जल्लोष हा सत्तेच्या मस्तीत इथल्या तरुणाईला झुरळ म्हणाऱ्या व्यवस्थेच्या नोकरदारांविरोधातला.... हा जल्लोष हा लोकशाही देशातील सुजाण तरुणाईचा...
धर्मेंद्र प्रधानानी राजीनामा दिला आणि 35 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थेच्या चुकांवर बोटं ठेवत थेट झुकलेल्या सरकारचे वाभाडेच काढले...झोपचं सोंग घेतलेल्या शिक्षण व्यवस्थेला जागं करत थेट केंद्र सरकारलाच हादरा देण्याचं काम इथल्या तरुणाईनं केलं....मात्र आंदोलनानंतर रोष वाढल्यानं विद्यार्थ्यांच्या भेटीला न आलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय म्हणाले ऐका....
जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात व करिअर घडवण्यावर केंद्रित करावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवलाय, असं धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पत्रात लिहलय...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या तरुणाईनं एकच जल्लोष केला...
मात्र प्रधानांनी राजीनामा देण्याआधी नेमकं काय घडंल? पाहूयात...
22 जुलै 2026
देशभरातील कलाकार आणि तरुणांचा CJPच्या आंदोलनाला पाठिंबा
23 जुलै 2026
11.52 वा.
पेपरफुटीचा खटला जलदगतीनं न्यायालयात चालवण्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही
23 जुलै 2026
मध्यरात्री 12.32 वा.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांचे उपोषण सोडवलं
23 जुलै 2026
वांगचुक यांच्या तीन मागण्या मान्य, मात्र त्यात प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी वगळली
24 जुलै 2026
सकाळी 7 वा.
CJPचे आंदोलक प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
24 जुलै 2026
दुपारी 1.30 वा.
CJPचे शिष्टमंडळ आणि मंत्री जितेंद्र सिंह, जे.पी.नड्डा यांच्यात दोन तास चर्चा
24 जुलै 2026
दुपारी 3.30वा.
सरकारनं प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय इतर मागण्यावर सकारात्मकता दाखवली
24 जुलै 2026
संध्याकाळी 4.00 वा.
CJPची सरकारसोबत चर्चा फिस्कटली आणि आंदोलन कायम
24 जुलै 2026
संध्याकाळी 4.30 वा.
अभिजित दिपकेंकडून 26 जुलैला देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचे तरुणांना आवाहन
24 जुलै 2026
रात्री 11.00 वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओद्वारे तरुणांचे आभार मानले
25 जुलै 2026
सकाळी 9.09 वा.
अभिजित दिपकेंनी टायफाईड झाल्याची माहिती दिली
25 जुलै 2026
दिपकेंना टायफाईड झाल्यानं आंदोलन थंडावणार अशी शक्यता वर्तवली जात होती
25 जुलै 2026
दुपारी 1.30वा.
पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्यानं पुन्हा एकदा गोंधळ
25 जुलै 2026
दुपारी 2.18 वा.
तरुणाईचा रोष वाढत असल्यानं अखेर प्रधानांचा राजीनामा
विरोधक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारला नमतं घ्यावं लागलयं....कारण एखाद्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची मोदी सरकारमधली ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हे आंदोलकांचं फार मोठं यश आहे. मात्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आणि पेपरफुटीसंदर्भातील येऊ घातलेल्या कडक कायद्यानंतर पेपरफुटीची प्रकरण थांबणार का? हा गंभीर प्रश्न उरतोच....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.