आज राजधानी दिल्लीत (Delhi) एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज सकाळी जखीरा येथे ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे ट्रेन उलटली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. (latest accident news)
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरलेले होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे (Train Accident) वृत्त नाही. ही घटना सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेल्वेचे डबे रूळावरून घसरले
डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की, रूळावर कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य सुरू आहे. परंतु अजून जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल आणि रेल्वेने मदतकार्य सुरू केलं (Delhi Train Accident News) आहे.
ही मालगाडी सकाळी 11.55 च्या सुमारास झाखिरा उड्डाणपुलाजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे ती पलटी उलटली झाली (Train Derail) आहे. अपघातस्थळावरील एका व्हिडिओमध्ये रेल्वे रुळावरून खाली घसरलेल्या बोगी दिसत आहेत. मालगाडी लोखंडी पत्र्याचे रोल घेऊन मुंबईहून चंदीगडला जात होती, अशी माहिती मिळतेय.
यापूर्वीची घटना
मागील वर्षी 6 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत मालगाडीला अपघात झाला होता. त्यामुळे बराच वेळ गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला होता. अपघाताबाबत चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती.
त्याआधी दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या गाझियाबादमध्येही मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली (Delhi Train Derail) होती. सप्टेंबर 2023 मध्ये, रेल्वे स्टेशनच्या यार्डातून गजरौलाकडे जाणारी मालगाडी मुख्य मार्गावर येताच रुळावरून घसरली होती. त्यामुळे १५ हून अधिक गाड्यांना उशीर झाला. यासह अनेक गाड्या वळवण्यात आल्या, तर सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर मालगाडीचा डबा रुळावर टाकून रवाना करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.