तामिळनाडूत (Tamil Nadu) महामार्गावर भरधाव बसने दुचाकीला चिरडले आहे. या अपघातात तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. दुचाकीला धडकणाऱ्या बसच्या डॅशकॅमने हा अपघात टिपला आहे. या घटनेविषयी आपण जाणून घेऊ या. (latest accident news)
या भीषण अपघाताची (Accident) व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. दुचाकीला धडकणाऱ्या बसच्या डॅशकॅममध्येच ही घटना कैद झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये दुचाकीस्वार इंडिकेटर न लावता रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. त्याचवेळी बस दुचाकीला चिरडताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अपघातामुळे परिसरात हळहळ
बस भरधाव वेगात असल्याचं समोर आलं आहे. बस चालकाचा वेग कमी करता आला नाही. त्याने दुचाकीला धडक दिल्याने अशोक कुमार (३२), त्यांची पत्नी सुशीला आणि तीन वर्षांचं बाळ बसच्या चाकाखाली आलं (Speeding Bus Crushed Bike) होतं. या अपघातात दुचाकीवरील जोडप्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तमिळ मीडियातील वृत्तानुसार, गंभीर दुखापतीनंतर सुशीला यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बस चालकासह कंडक्टरने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी जमाव संतप्त झाला (Accident News) होता.
अपघातामुळे जमाव संतप्त
या अपघातामुळे (Accident) परिसरातील रहिवाशांनी बेशिस्त बस चालकांवर कारवाई न केल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सध्या जमावाला शांत केलं आहे. या बस चालक आणि कंडक्टरवर आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं (Chennai Accident News) आहे.
तामिळनाडूत महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळजाचा ठोकाच चुकतो. या घटनेत तीन वर्षाच्या बाळाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात (3 year old Child Death) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.