Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळली; विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Tempo Container Car Accident: पुणे नाशिक महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या अपघात कारने पेट घेतल्यामुळे तिघांचा होरपळून मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे.
Pune Nashik Highway Accident
Pune Nashik Highway AccidentSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे

Triple Accident On Pune Nashik Highway

पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे. (latest accident news)

अपघातात कारने अचानक (car burnt) पेट घेतला. त्यामुळं तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पहाटे सहा वाजेदरम्यान हा अपघात झाला आहे. घाटात उतारावर कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात (Triple Accident) आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन वाहने एकमेकांवर आदळले

या अपघातामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली (Tempo Container Car Accident) होती. रोहिदास राक्षे, विराज कदम, आणि अंकुश भांबुरे असे अपघातात होरपळुन मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत. हा अतिशय भीषण अपघात होता. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात (Pune Nashik Highway Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले होते.

Pune Nashik Highway Accident
Pune Accident News: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव डंपरने खासगी बसला उडवलं, थरारक घटना

बीडमधील अपघाताची घटना

बीड -परळी महामार्गावरील जिरेवाडीजवळ गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावरील पुलाचं काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळं तेथे अपघात होतात. नुकतेच झालेल्या अपघातात परळी येथील डॉक्टरचा बळी गेला आहे. डॉ. वाल्मीक मुंडे, असं अपघातात जागीच ठार झालेल्या डॉक्टरचं नाव आहे.

परळीच्या जिरेवाडी बायपास रोडवर गावालगत नाल्यावर पुलाचं काम सुरू आहे. या ठिकाणी कामाचा कोणताही दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. तसेच नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले (Accident News) आहेत. त्यामुळे वाहन चालवताना अनेक वाहन चालकांना अडचणी येत आहेत. यादरम्यान नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने डॉक्टरची कार रस्त्यावर पडलेल्या पाईपला धडकली. खाली खड्ड्यात कोसळली होती.

Pune Nashik Highway Accident
Accident News: शहापूर-सातोना मार्गावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, पती आणि २ मुले गंभीर जखमी, संतप्त जमावाने वाहन पेटविले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com