
दिल्लीत घर मालकीण नोकराला ओरडल्यामुळे नोकराने मालकिणीची आणि तिच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील लाजपत नगरमधील एका घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन मृतदेह सापडले. या घटनेपासून घरातील नोकर फरार झाला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आले आहेत.
दिल्लीतील लाजपत नगरमधील परिसरात एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळला. घरात बराच वेळ फोन करून सुद्धा कोणीही उत्तर देत नसल्याने मृत महिलेच्या पतीला संशय आला. तिच्या पतीने पोलिसांना कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराच्या दारावर ठोठावूनही कोणीही दार उघडले नाही.
म्हणून पोलिस दरवाजा तोडून आता शिरले. आत गेल्यावर त्यांना आई आणि मुलाचे मृतदेह चिरलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. मुलाचा मृतदेह बाथरूममध्ये तर आईचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. या घटनेनंतर घर रक्ताने माखले होते आणि घरातील नोकर बेपत्ता झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने नोकराला शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या नोकराने रंगाच्या भरात महिलेचा आणि तिच्या मुलाचा गळा चिरून हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला मात्र पोलिसांच्या तावडीतून सुटला नाही. पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.