Delhi Rajendra nagar : दिल्लीत मोठी दुर्घटना, कोचिंग सेंटरच्या तळघरात भरलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू,१ बेपत्ता

Delhi Rajendra nagar Incident : दिल्लीत मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात भरलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १ विद्यार्थी बेपत्ता आहे.
दिल्लीत मोठी दुर्घटना, कोचिंग सेंटरच्या तळघरात भरलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू,१ बेपत्ता
delhi rajendra nagarSaam tv
Published On

नवी दिल्ली : दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या राजेंद्रनगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची घटना घडली. या भरलेल्या पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी मदतकार्याला पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील नाला फुटल्यानंतर जवळील असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरलं. कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी अडकले. या दुर्घटनेत पाण्यात अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या पाण्यात आणखी काही विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. या पथकाने तातडीने विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला.

दिल्लीत मोठी दुर्घटना, कोचिंग सेंटरच्या तळघरात भरलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू,१ बेपत्ता
Israel Air Strike: इस्रायली सैन्याकडून गाझावर आणखी एक मोठा हवाई हल्ला, ३० जणांचा मृत्यू

राजेंद्र नगरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही मुली आहेत. अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. या सेंटरमध्ये आणखी एक व्यक्त अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफकडून अजूनही शोध मोहीम सुरु आहे.

शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

राव कोंचिग सेंटरमध्ये पाणी भरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेवर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, 'अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित आहेत. माझंही घटनास्थळावर लक्ष आहे. दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्याला अजिबात माफ केलं जाणार नाही'.

दिल्लीत मोठी दुर्घटना, कोचिंग सेंटरच्या तळघरात भरलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू,१ बेपत्ता
Delhi Fire News : दिल्लीतील फूड फॅक्टरीला भीषण आग; बॉयलरचा स्फोट झाल्याने 3 कामगार होरपळले, 6 गंभीर जखमी

नेमकं काय घडलं?

घटनास्थळी उपस्थित विद्यार्थ्याने सांगितलं की, 'आज सायंकाळी ७ वाजताच्या आसपास ग्रंथालय बंद करण्यात येतं. त्यावेळी आम्ही एकूण ३५ विद्यार्थी होतो. आम्हाला तातडीने बाहेर निघण्यास सांगितलं. त्यामुळे विद्यार्थी तळघरातून बाहेर येत होते. याचवेळी तळघरात प्रचंड वेगाने पाणी आल्याने त्यात काही विद्यार्थी अडकले. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तळघर पाण्याने भरलं. पाणी इतकं खराब होतं की, काहीच दिसत नव्हतं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com