

राहुल गांधी यांनी गोवा दौरा रद्द केला
काँग्रेसच्या आमदार- खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आले
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे दिल्लीत आंदोलन
राहुल गांधींनी सीजेपीच्या आंदोलना दिला पाठिंबा
दिल्लीमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपी आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला गोवा दौरा रद्द करत सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे आदेश दिले आहेत. याआधी राहुल गांधी यांनी मोठी घोषणा देखील केली आहे. राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. १२ ऑक्टोबरला म्हणजे मंगळवारी तरुणांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली. त्याचसोबत, इंडिया आघाडी आणि देशातील तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असून हा आवाज संपूर्ण देशभरात पसरेल असे ते म्हणाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी अचानक गोवा दौरा रद्द केला. त्यांनी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि खासदारांना दिल्लीत पोहोचण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी आपला गोवा दौरा रद्द केला. राहुल गांधी आज दिल्लीत पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता आहे. सीजेपीचे आंदोलन आणि राहुल गांधी देखील आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेता आता दिल्लीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजार करण्यासाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सीजेपीने सोशल मीडियावर आणि पोलिस आयुक्तांकडे ३ प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. बेकायदेशीर कोठडीतून नेत्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी. ते सध्या कुठे आहेत याबद्दलची अधिकृत माहिती त्वरित जाहीर केली जावी आणि त्यांना त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याची आणि भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सीजेपीकडून करण्यात आली आहे. 'लोकांना अशा प्रकारे गायब करून त्याला लोकशाही म्हणता येणार नाही,', अशा शब्दांत सीजेपीने दिल्ली पोलिस प्रशासनावर निशाणा साधला आहे.
कोणताही अधिकारी किंवा कायदा उत्तरदायित्वाच्या वर नाही, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी विलंब न करता या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी ठाम भूमिका कॉकरोच जनता पार्टीने घेतली आहे. दरम्यान, सीजेपीचे नेते ७००० पेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीत तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र आहे. त्यातच सीजेपीची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी आज ११ वाजता 'चलो जंतर मंतर नारा' दिला आहे. त्यामुळे दिल्लीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.