दिल्ली, ता. १ ऑगस्ट २०२४
राजधानी दिल्लीमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाने नव्या संसद भवनाच्या इमारतीत गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या नेत्याने यासंबंधी व्हिडिओ ट्वीट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अगदी दिमाखात नव्या संसदेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र वर्ष होण्याआधीच नव्या संसदेला गळती लागल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.
कालपासून राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने दिल्लीमधील मुख्य रस्ते जलमय झाले असून शहरात अनेक भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका नव्या संसद भवनाच्या इमारतीला बसला असून संसद भवनाला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
"बाहेर पेपर गळती, आममध्ये पाणी गळती. थोड्याशा हवामानातील बदलानंतर राष्ट्रपतींनी वापरलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळायला लागले. या मुद्द्यावर लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे, असे काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी व्हिडिओही शेअर केला ज्यामध्ये इमारतीला गळती लागल्याचे दिसत आहे.
दरम्यान, काही महिन्यांआधीच अयोध्येतील राम मंदिराला गळती लागल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या नव्या संसद भवनाला गळती लागल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच सध्या अधिवेशन सुरू असल्याने हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.