Fire Death: अग्नितांडव! ५ मजली रेस्टॉरंट आगीत भस्मसात; २० जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Delhi Malviya Nagar Fire News Update : दिल्लीतील मालवीय नगर भागातील पाच मजली इमारतीला भीषण आग लागून २० जणांचा मृत्यू झाला. २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत जाहीर केली आहे.
Delhi Malviya Nagar restaurant fire latest death Toll updates
Delhi Malviya Nagar restaurant fire latest death Toll updatesANI
Published On

Delhi Malviya Nagar restaurant fire latest death Toll updates : राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी सकाळी ५ मजली इमारतीला भीषण आग लागली. मालवीय नगर परिसरात लागलेल्या या अग्नितांडवात रेस्टॉरंट भस्मसात झाले. या दुर्घटनेत २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. २५ पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचेही समजतेय. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज साखील ९ वाजताच्या सुमारास ५ मजली रेस्टॉरंटला आग लागल्याची माहिती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदतही मोदींनी जाहीर केली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आणि सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांपैकी बरेच जण परदेशी नागरिक आहेत. बचाव मोहिमेदरम्यान इमारतीमधून एकूण ३७ जणांना वाचवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्या सर्वांना सेंट्रलाइज्ड ॲक्सिडेंट अँड ट्रॉमा सर्व्हिसेस (CATS) च्या रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, याआधी तळघरातून तीन जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

Delhi Malviya Nagar restaurant fire latest death Toll updates
Fire Breaking: मोठी दुर्घटना! प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

पंतप्रधान मोदींनी मालवीय नगर आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू झाले आहे. त्याशिवाय इमारतीत आणखी कुणी अडकले आहे का? याचाही तपास केला जात आहे.

अग्निशमन दलाला सकाळी ८.५० वाजता कॉल आला. सुरुवातीला घटनास्थळी सात अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या. आणखी वाहने मार्गावर होती, पण अखेरीस, सर्व आवश्यक पथके पोहोचली. आमचे पथक घटनास्थळी पोहोचताच, त्यांनी तात्काळ इमारतीमधून ३७ लोकांना वाचवले. ही एक बहुमजली इमारत आहे. यात एक तळघर, एक तळमजला आणि पाच वरचे मजले आहेत. घटनास्थळी असलेल्या लोकांशी केलेल्या चौकशीतून आम्हाला असे समजले आहे की, ही इमारत एक स्वतंत्र निवासी संकुल म्हणून कार्यरत नाही. उलट असे दिसते की बहुतेक रहिवासी अशा व्यक्ती होत्या, ज्यांच्या ओळखीच्या लोकांवर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे या व्यक्ती त्याच विशिष्ट उद्देशाने येथे राहत असण्याची शक्यता आहे. रहिवाशांमध्ये परदेशी नागरिकही होते.
- ए. के. मलिक, अग्निशमन अधिकारी
Delhi Malviya Nagar restaurant fire latest death Toll updates
TMC split : 'त्या' राज्यातही महाराष्ट्र पॅटर्न! २ तृतीयांश आमदार-खासदार फुटल्याचा दावा; राजकारणात मोठी खळबळ

"साडेनऊच्या सुमारास आम्ही पाहिलं की इथे खूप भीषण आग लागली होती. त्यावेळी मी आणि माझा मित्र स्कूटरवर होतो, सगळीकडे आग भडकली होती आणि लोक इमारतीवरून इकडून तिकडून उड्या मारत होते. आम्ही सुमारे ५ लोकांना उड्या मारताना पाहिलं. एका व्यक्तीचा पायही मोडला. इथला संपूर्ण रस्ता बंद झाला होता. तिथे गर्दी जमली होती, असे ओम नावाचा एक स्थानिक रहिवाशाने सांगितले."

Delhi Malviya Nagar restaurant fire latest death Toll updates
Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पाहा 3 जून रोजी किती बदलला भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com