

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी
दिल्ली सरकारने मद्यप्रेमींसाठी घेतला मोठा निर्णय
दिल्लीमध्ये ऑनलाइन दारू बुकिंगसाठी ॲप तयार
यापुढे दारू ऑनलाइन पद्धतीने बुक करता येणार
मद्यप्रेमींसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली. आता दिल्लीत ऑनलाईन दारू बुक करता येणार आहे. दिल्ली सरकारने दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी नव्या अॅप लॉन्च केला आहे. दिल्ली लिकर बुकिंग' (Delhi Liquor Booking) नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन दिल्ली सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमींना ऑनलाइन बुकिंगद्वारे दारू उपलब्ध होणार आहे.
युजर्स या ॲपवरून उपलब्ध ब्रँड पाहू शकतात, विशिष्ट किरकोळ दुकान निवडू शकतात आणि दारूच्या बाटल्यांचे प्रमाण ठरवून ऑनलाइन पेमेंट करू शकतात. पेमेंट झाल्यानंतर एक क्यूआर कोड (QR Code) जनरेट होतो. ऑर्डर गोळा करण्यासाठी तुम्हाला निवडलेल्या दुकानावर हा कोड दाखवावा लागेल. हे ॲप फक्त दुकानावरून स्वतः जाऊन दारू आणण्यासाठी (स्टोअर पिकअप) आहे. याची होम डिलिव्हरी उपलब्ध नाही.
एकदा बुकिंग आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ४८ तासांच्या आत निर्धारित दुकानातून तुमची ऑर्डर घ्यावी लागेल. दिल्लीच्या उत्पादन शुल्क (excise) नियमांनुसार, ॲप वापरण्यासाठी आणि दारू खरेदी करण्यासाठी तुमचे वय किमान २५ वर्षे असणे आवश्यक आहे. कायदेशीर नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त ९ लिटर व्हिस्की आणि १८ लिटर बिअर खरेदी करू शकते.
ही सुविधा सध्या केवळ DSIIDC द्वारे चालवल्या जाणाऱ्या दुकानांसाठी लागू आहे (राजधानीत अशा जवळपास २०८ शाखा आहेत). दिल्लीत ७०० हून अधिक किरकोळ दुकाने चालवणाऱ्या चार सरकारी महामंडळांपैकी इतर महामंडळांच्या दुकानांना ही सुविधा लागू नाही. पिकअप करण्यापूर्वी ॲपद्वारे ऑर्डर रद्द करता येते. पण एकदा उत्पादने गोळा केल्यानंतर किंवा हातात आल्यावर परतावा किंवा रिफंडची (परतफेडीची) कोणतीही तरतूद यामध्ये करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.