दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट पेपरफुटीवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोदी सरकारला हादरे बसलेत. काही वर्षांपूर्वीचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन आणि इतर अनेक ऐतिहासीक आंदोलनांचं साक्षीदार असलेलं जंतरमंतर मैदानाला आता अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असणार आहे. देशभरातील जेन झीने केलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून या मैदानावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास कॉक्रेच जनता पक्षाने पुन्हा आंदोलनचा इशारा दिल्याने दिल्ली पोलीस प्रशासन सतर्क झालंय.
दिल्लीत जंतर-मंतरवर अभेद्य तटबंदी
जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि शिघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी नेहमीच्या बॅरिकेड्सऐवजी आता 8 फूट उंच बॅरिकेड्स मैदानाच्या बाहेर ठेवली आहेत. अत्यंत मजबूत आणि जास्त वजन असलेले लोखंडी बॅरिकेड्स आणले आहेत. पिवळ्या रंगाचे हे बॅरिकेड्स सहज ओलांडणे किंवा बाजूला करणे आंदोलकांना शक्य होणार नाही. संसद मार्ग आणि जय सिंह मार्ग बॅरिकेड्स उभारण्यात आलेत. विशेष म्हणजे हे बॅरिकेड्स वेल्डिंगनं जोडलेले आहेत.
जंतर-मंतरच्या मुख्य परिसरात आंदोलकांनी प्रवेश करू नये आणि पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही तटबंदी उभारल्याचं बोललं जातंय. मात्र यामुळे जंतरमंतरील भविष्यातल्या सर्वच आंदोलनांवर नियंत्रण येणार की काय असा संशय यानिमित्तानं व्यक्त करण्यात येतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.