वकिलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Lawyer Kisses Woman Before Hearing: दिल्ली हायकोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीपूर्वी वकिलानं महिलेला किस केलं. याचा व्हिडिओ व्हायरल. नेटिझिन्सकडून टिकेचा पाऊस.
Lawyer Kisses Woman Before Hearing
Lawyer Kisses Woman Before HearingSaam
Published On
Summary
  • दिल्ली हायकोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीपूर्वी भयंकर घडलं.

  • सुनावणीपूर्वी वकिलानं महिलेला किस केलं.

  • धक्कादायक व्हिडिओ व्हायरल.

कोर्टरूममधील गंभीर युक्तीवाद, न्यायाधीशांनी ओढलेले ताशेरे, किंवा वकिलांचे मुद्दे आपण या गोष्टी कोर्टात पाहिल्या असतील. मात्र, सध्या दिल्ली हायकोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोर्टाच्या गणवेशातील वकील सुनावणी सुरू होण्यापूर्वी एका महिलेला किस करताना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार एकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल कोर्टाची सुनावणी सुरू असल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायाधीश हजर नव्हते. सर्वजण त्यांच्या प्रतिक्षेत होते. त्यावेळी वकिलांनी आपल्या कॅमेऱ्यांद्वारे लॉगिन केलं होतं.

Lawyer Kisses Woman Before Hearing
राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

व्हिडिओमध्ये संबंधित वकील कोर्टाचा गणवेश घालून आपल्या खोलीत बसलेले दिसत आहे. त्यांच्यासमोर साडी परिधान केलेली एक महिला खोलीत येते. अचानक वकील त्या महिलेचा हात पकडून तिला जवळ खेचतात. नंतर तिच्या ओठांवर चुंबन घेतात. महिला त्यावेळी थोडी अस्वस्थ होते. काही क्षणातच मागे सरकते.

Lawyer Kisses Woman Before Hearing
पुणेकरांना दिलासा! १०० वर्षे जुन्या भुयारी मार्गाचे रूंदीकरण होणार, वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका

हा संपूर्ण प्रकार व्हर्च्युअल लाईव्ह कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, नेटिझन्सकडून या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी वकिलांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. संबंधित वकील आणि महिलेची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com