पुणेकरांना दिलासा! १०० वर्षे जुन्या भुयारी मार्गाचे रूंदीकरण होणार, वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका

PMC Plans Underpass Expansion: पुण्यातील आरटीओ चौक आणि मंगळवार पेठ परिसरातील भुयारी मार्गाचा विस्तार होणार. १०० वर्षे जुने भुयारी मार्ग अपुरा पडत असल्यामुळे महापालिकेचा निर्णय.
PMC Plans Underpass Expansion
PMC Plans Underpass ExpansionSaam Tv
Published On
Summary
  • पुणेकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका.

  • भुयारी मार्गाचे रूंदीकरण होणार.

  • दुहेरी मार्गामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सध्या शहरातील सर्वात गंभीर समस्या बनलीये. या वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. कार्यालय सुरू आणि सुटण्याची वेळ यामुळे शहरातील बऱ्याच मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी प्रयत्न होतायेत. मात्र, आता पुणेकरांची आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. या परिसरातील अरूंद रेल्वे भुयारी मार्गाचा विस्तार करण्याच्या दिशेनं पावली उचलली गेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेनं या मार्गाचा रूंदीकरणासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केलीये. लवकरच यासंदर्भात सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हा भुयारी मार्ग पुणे रेल्वे स्थानक, मालधक्का, ससून रूग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ कार्यालय यांसारख्या महत्वाच्या ठिकाणांना जोडतो. मात्र, अरूंद असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होती.

PMC Plans Underpass Expansion
'कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत सामूहिक बलात्काराचा प्रयत्न', कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर

पाच मीटर रूंद असलेला हा भुयारी मार्ग शंभर वर्षांपूर्वी बांधलेला होता. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे या अरूंद मार्गावर वाहने घेऊन जाणे आता कठीण होते. परिणामी प्रवाशांना वेळेत पोहोचणं अवघड होते. अवजड वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

PMC Plans Underpass Expansion
लग्नानंतर दुसरीवर जीव जडला, गर्लफ्रेंडकडून छळ, पंतप्रधानांना पत्र लिहून तरूणानं आयुष्य संपवलं

भुयारी मार्गाचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, रेल्वे प्रशासनालाही याबाबत पत्र पाठवण्यात आलंय. रेल्वेकडून जागा मिळाल्यास लवकर कामाला सुरूवात केली जाईल. सध्या भुयारी मार्गाच्या शेजारी नऊ ते दहा मीटर रूंदीचा नवीन बोगदा बांधण्याचा आणि जुन्या मार्गाचेही रूंदीकरण करण्याचा मानस आहे. परिणामी एकत्रित सुमारे वीस मीटर रूंदीचा दुहेरी मार्ग तयार होणार असून, यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com