Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

Delhi Shocking : मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने रागाच्या भरात १५ वर्षीय भावाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण दिल्लीत खळबळ उडालीये.
India mobiles update
India mobilesSaam tv
Published On

राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईल खेळू नको, असं बहीण ओरडल्यानंतर मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

India mobiles update
Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

मिळलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिल्लीतील आदर्शनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला १५ वर्षीय मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी तपास सुरु केला.

पोलीस उपायुक्त भीष्म सिंह यांना पोलीस तपासादरम्यान आदर्श नगरमधील आदर्श नावाच्या मुलाने बहीण ओरडल्याने टोकाचं पाऊल उचललं. मुलाच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

मोठी बहीण भावाला मोबाइल खेळू नको, म्हणून ओरडली. भाऊ अभ्यास करत नसल्याने मोठी बहीण गेम खेळू नको, म्हणून ओरडत होती.

India mobiles update
KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श इयत्ता ९वीत शिकत होता. इयत्ता नववीत असलेल्या आदर्शने घरात पंख्याला फास घेतला. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी आदर्शला मृत घोषित केलं. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत कार्यवाही सुरु केली आहे. आदर्शचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात.

India mobiles update
Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

पतीने कोयत्याने वार करत घेतला पत्नीचा जीव

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील झोरियनपुरामध्ये बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. कालीचरण नावाच्या तरुणाने कोयत्याने वार करून पत्नी उर्मिला देवीची हत्या केली. पत्नीची हत्या करून पती फरार न होता, पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. पतीचं कृत्य पाहून गावकरी घाबरले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचत आरोपीला पकडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com