Building Collapse: सकाळी झोपेत असताना इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

Delhi Building Collapsed: दिल्लीमध्ये इमारत कोसळली. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
Building Collapse: सकाळी झोपेत असताना इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
Building CollapseSaam Tv
Published On: 

दिल्लीमध्ये आज सकाळी इमारत कोसळली. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहे. दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. दिल्लीतील विवेक विहार येथील ज्वाला नगरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास शाहदरा येथील ज्वाला नगर गल्ली क्रमांक ६ मधील पीर बाबा मजारजवळ इमारत कोसळली. तात्काळ घटनास्थळी चार अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या आणि बचाव व शोध मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत ७ जणांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तीन वर्षांच्या मुलाचा आणि एका ३५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

Building Collapse: सकाळी झोपेत असताना इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
Building Collapse: इमारत दुर्घटनेप्रकरणी मालकाला अटक, उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

इमारत कोसळल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य करत ६ जणांचे प्राण वाचवले आणि त्यांना उपचारासाठी डॉ. हेडगेवार रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यापैकी दोघांना मृत घोषित केले. एका जखमी व्यक्ची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळावर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Building Collapse: सकाळी झोपेत असताना इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

पोलिसांनी सांगितले की, ही इमारत घर सुरेंद्र सिंग नावाच्या व्यक्तीचे होते. सर्व जखमी त्या दोन मजली इमारतीत भाड्याने राहणारे होते. मृतकांची ओळख पिंटू (३५ वर्षे) आणि दिव्यांशू उर्फ ​​लड्डू (३ वर्षे) अशी पटली आहे. तर ५ जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

Building Collapse: सकाळी झोपेत असताना इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
Building Collapse: दिल्लीत ३ मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.