पुणे पोलिस दलात मोठे खांदेपालट; सहा वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या, प्रशासनात खळबळ

Pune Police Six Inspectors Transfer Latest News: पुणे शहर पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
PUNE POLICE RESHUFFLE
PUNE POLICE RESHUFFLEsaam tv
Published On: 

पुणे शहर पोलिस दलातील सहा पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १२) यासंदर्भातील आदेश जारी केले. या बदल्यांमुळे बंडगार्डन, लष्कर आणि लोणीकाळभोर पोलिस ठाण्यांना नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात संतोष पांढरे, शशिकांत चव्हाण, युवराज हांडे, मारुती खेडकर, समाधान पवार आणि प्रदीप पवार यांचा समावेश आहे.

PUNE POLICE RESHUFFLE
३.७५ लाख रेकॉर्ड्स चोरीला? SBI च्या ग्लोबल IT सेंटरमध्ये नेमकं काय घडलं?

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि नवीन नेमणुका पुढीलप्रमाणे :

1. संतोष पांढरे – पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा (पूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन).

2. शशिकांत चव्हाण – वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे (पूर्वी विशेष शाखा).

3. युवराज हांडे – पोलिस निरीक्षक, विशेष शाखा (पूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर).

4. मारुती खेडकर – वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे (पूर्वी गुन्हे शाखा).

PUNE POLICE RESHUFFLE
Accident News : कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू

5. समाधान पवार – वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलिस ठाणे (पूर्वी खडक पोलिस ठाणे – गुन्हे).

6. प्रदीप पवार – पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा – खडक पोलिस ठाणे (पूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकाळभोर).

या बदल्यांमुळे पुणे शहर पोलिस दलातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल झाला असून, नव्या अधिकाऱ्यांकडे संबंधित ठाण्यांचा कार्यभार सोपवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.