Delhi Borewell Accident: खेळता-खेळता चिमुकला ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला; दिल्लीतील घटना, बचावकार्याचा Video समोर

Boy Fell Into Borewell: दिल्ली जल बोर्ड प्लांटमधील 40 फूट खोल बोअरवेलमध्ये एक मूल पडले आहे. त्याच्या सुटकेसाठी बचाव मोहिम सुरू आहे.
Delhi Borewell Accident
Delhi Borewell AccidentSaam Tv
Published On

Rescue Operation Delhi News

दिल्लीतील केशोपूर मंडी भागात एक मूल खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडले. केशापूर मंडीजवळ दिल्ली जल बोर्ड प्लांटच्या आत 40 फूट खोल बोअरवेल (Delhi Borewell Accident) आहे. ज्यामध्ये एक मुलगा खेळत असताना अचानक पडला. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा आणि दिल्ली पोलिसांनी मुलाला वाचवण्यासाठी घटनास्थळ गाठले. (latest marathi news)

यानंतर परिस्थितीचा आढावा घेत एनडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. सध्या या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू (Delhi News) आहेत. मात्र, अजून यश मिळालेले नाही. एनडीआरएफ टीमने सांगितले की, बोअरवेलला समांतर आणखी एक बोअरवेल खोदण्याची तयारी सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीत मूल बोअरवेलमध्ये पडले

रेस्क्यु टीमने दिलेल्या माहितीनुसार बोअरवेलची खोली 40-फूट आहे. त्यातून मुलाला बाहेर काढणं खूप कठीण आहे. नवीन बोअरवेल खोदण्यासाठी एनडीआरएफ टीमला बराच वेळ लागू शकतो. बोअरवेलजवळ जेसीबीने सुमारे 50 फूट खोदकाम करण्यात येणार (Rescue Operation) आहे. त्यानंतर पाईप कापून मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम बोअरवेलच्या शेजारी आणखी एक बोअरवेल खोदण्याच्या तयारीत आहे. ज्या खड्ड्यात मुलगा पडला त्याची खोली 40 फूट (Boy Fell Into Borewell) आहे. अशा परिस्थितीत ते बाहेर काढणे कठीण होऊ शकते. त्याचबरोबर नवीन बोअरवेल खोदण्यासही वेळ लागू शकतो.

Delhi Borewell Accident
MP Girl Fell Into Borewell Update: आयुष्याची लढाई हरली! 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीचा मृत्यू

घटनास्थळी बचावकार्य सुरू

बोअरवेलमध्ये अकडलेल्या या मुलाशी बोलण्याचाही सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून त्याला अस्वस्थ वाटू नये. बाळाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू (Jal Board Plant) आहे. अग्निशमन पथक, एनडीआरएफची टीम आणि दिल्ली पोलिसांची पथक हे बचावकार्य करत आहेत.

बचाव पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या टीमने मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात खड्ड्यात दोरी सोडली (Accident News) होती. मात्र, यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे आता दुसरी पद्धत अवलंबत बचाव कार्यात गुंतलेली टीम आणखी एक बोअरवेल खोदण्याचा विचार करत आहे.

Delhi Borewell Accident
Woman 160kgs Falls Off Bed: १६० किलो वजनाची रुग्ण महिला बेडवरून पडली; थेट आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना बोलावलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com