MP News: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्या सृष्टीचा (Girl Fell Into Borewell) मृत्यू झाला. मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगवली गावामध्ये ही घटना घडली. चिमुकल्या सृष्टीला सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कराचे जवान आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. पण त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले.
सृष्टीला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ व्यतिरिक्त लष्कराचेही सहकार्य घेण्यात आले. अखेर गुरुवारी गुजरातमधून रोबोटिक टीम बोलावण्यात आली होती. रोबोटिक टीमने सृष्टीला बोअरमधून बाहेर काढले आणि त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सृष्टीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांसह सर्वांना मोठा धक्का बसला.
मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगावली येथे राहणारी तीन वर्षांची सृष्टी खेळता खेळता अचानक शेतातील बोअरवेलमध्ये पडली. ती जेव्हा बोअरवेलमध्ये पडली त्यावेळी ती 20 फूटांवर अडकली होती. पण बचावकार्य करत असताना ती आणखी खाली गेली आणि 100 फूटांवर जाऊन अडकली होती. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या. सृष्टीला पाईपच्या सहाय्याने ऑक्सिजन दिला जात होता. सृष्टीला वाचवण्यासाठी 50 तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण तिला वाचवण्यात यश आले नाही.
दरम्यान, बिहारमध्ये पुलाच्या पिलरमध्ये अडकलेल्या 12 वर्षांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. अनेक प्रयत्नांनंतर देखील या मुलाला वाचवण्यात यश आले नाही. मुलगा पुलाच्या पिलरमध्ये कसा काय अडकला हेच कोणाला समजत नव्हते. त्याला त्याठिकाणावरुन काढणे खूपच कठीण होते पण त्याला वाचव्यात यश आले नाही. दोन दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. त्याला शोधत असताना तो रोहतासच्या सोन नदीच्या पुलामध्ये अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्याला बाहेर काढणे जमले नाही. म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितले. बरेच प्रयत्न करुन देखील त्याला वाचवता आले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.