Delhi Assembly Election: दिल्लीचं तख्त कोण जिंकणार? ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात, मतदानाला सुरूवात

Delhi Assembly Election Voting: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत असून ६९९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Delhi Assembly Election: दिल्लीचं तख्त कोण जिंकणार? ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणार, मतदानाला सुरूवात
Delhi Assembly ElectionSaam Tv
Published On

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठी आज मतदान होत आहे. दिल्लीचा तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत असून ६९९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे. १.५६ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दिल्लीकरांनी सकाळपासून गर्दी केली आहे.

दिल्लीमध्ये गेल्या १० वर्षांपासून आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजप आणि काँग्रेस त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहेत. चालेल, निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या, ३५,६२६ पोलिस आणि १९,००० होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात आहेत. ३,००० संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोनची नजर असणार आहे.

Delhi Assembly Election: दिल्लीचं तख्त कोण जिंकणार? ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणार, मतदानाला सुरूवात
Delhi Assembly Election: भाजप की केजरीवालांचा आम आदमी पक्ष? दिल्लीकरांचा कौल कुणाला मिळणार?

'घरी जाऊन मतदान करा' योजनेअंतर्गत ६,९८० मतदारांनी आधीच मतदान केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान 'आप'ने मोफत सुविधांवर भर दिला आहे. भाजपने भ्रष्टाचार आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित केले, तर काँग्रेसने बेरोजगारी भत्त्याचे आश्वासन दिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ८ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. दिल्लीवर पुन्हा कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Delhi Assembly Election: दिल्लीचं तख्त कोण जिंकणार? ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणार, मतदानाला सुरूवात
Delhi Politics : एक बैठक आणि ८ आमदारांचे राजीनामे; आम आदमी पक्षात नेमकं काय घडतंय? वाचा Inside स्टोरी

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी येथून भाजपचे रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. दिल्लीमध्ये तिहेरी लढत असून यापैकी कोणता पक्ष बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचे ठरेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Delhi Assembly Election: दिल्लीचं तख्त कोण जिंकणार? ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणार, मतदानाला सुरूवात
Delhi Crime Season 3: शेफाली शाहच्या दिल्ली क्राइममध्ये 'या' अभिनेत्रीचा एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत करणार डीसीपीशी सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com