Maharashtra Politics : शिंदे गटावर फडणवीसांचं नियंत्रण? भाजपने फसवल्याची शिंदेंची भावना, राऊतांच्या दाव्याने राज्यात खळबळ

Maharashtra Politics News : ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून शिंदे गटाच्या आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचं म्हटलंय. नेमका हा दावा काय आहे आणि शिंदे गटाने त्याला कसं उत्तर दिलंय. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Politics : महायुतीने सत्ता स्थापन केली. मात्र कधी मंत्रिपदावरुन तर कधी पालकमंत्रिपदावरुन महायुतीत धुसफूस कायम आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून थेट महायुतीतील अस्वस्थतेवर प्रहार केलाय. शिंदे गटातील आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा दावा ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केलाय.

ठाकरे गटाच्या मुखपत्रात काय?

- महायुती सरकारकडे बहुमत असूनही राज्य अस्थिर

- शिंदे आणि फडणवीसांमध्ये मतभेद

- शिंदेंची बार्गेनिंग पॉवर भाजपने संपवली

- महत्वाची खाती, उपमुख्यमंत्रिपद मिळूनही शिंदेंचा चेहरा शुन्यात

- भाजपने पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा शब्द न पाळल्याने एकनाथ शिंदे नाराज

- शिंदे गटातील 40 पैकी 20-25 आमदार फडणवीस- शाहांमुळे फुटले

- काही आमदारांमध्ये चलबिचल असून मागे फिरायचं का? अशी चर्चा

शिंदे गटाच्या 20-25 आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण आहे. तर शिंदे गटाच्या काही आमदारांमध्ये चलबिचल असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर नितेश राणेंनी मात्र संजय राऊतच ठाकरे गटात किती काळ राहणार? असा सवाल उपस्थित केलाय. मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असताना विजय वडेट्टीवारांनी शिंदेंना बाजूला सारुन शिवसेनेत नवा 'उदय' होण्याचे संकेत दिले होते.

Maharashtra Politics
Maharashtra Kesari 2025 : पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी! महेंद्र गायकवाडला केलं चितपट, जिंकली मानाची गदा

आधीच महायुतीत पालकमंत्रिपदावरुन शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगलीय.. त्यात आता राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नियंत्रण असेल तर शिंदे गटाची आणखीच कोंडी होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शिंदेंना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळणार की पुन्हा राज्यात नवा भूकंप होऊन शिंदेंचीही शिवसेना फुटणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.

Maharashtra Politics
Maharashtra Kesari 2025 : "माझी पाठ टेकलीच नाही, रिप्ले दाखवा", शिवराज राक्षे पंचांवर का भडकला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com