Maharashtra Kesari 2025 : पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी! महेंद्र गायकवाडला केलं चितपट, जिंकली मानाची गदा

Maharashtra Kesari 2025 Winner : आज अहिल्यानगरमध्ये ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची गदा उचलली.
Maharashtra kesari 2025 final match winner
Maharashtra kesari 2025 final match winnerSaam Tv
Published On

Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. या सामन्यामध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळचा विजय झाला. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला. या विजयानंतर मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

पृथ्वीराज मोहोळ गादी गटातून तर महेंद्र गायकवाड हा माती गटातून अंतिम फेरीत पोहोचला होता. सामना सुरु होताच पृथ्वीराजने पहिला पॉईंट मिळवून आघाडी घेतली. पहिल्या फेरीत मोहोळने आघाडी घेतल्यानंतर गायकवाडने पॉईंट मिळवत बरोबरी केली. पुढे मोहोळने आणखी एक पॉईंट मिळवला.

पृथ्वीराज मोहोळने दुसरा पॉईंट मिळवल्यानंतर काही क्षणांसाठी गोंधळ झाला आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. पुढे पंचांनी मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोहोळला महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल करण्यात आला. त्याला चांदीची मानाची गदा आणि थार गाडी पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आली.

Maharashtra kesari 2025 final match winner
India vs England : टीम इंडियाचा वानखेडेवर विजयी 'अभिषेक'; इंग्लंडवर मिळवला सर्वात मोठा विजय, मालिकाही जिंकली

अंतिम सामन्यापूर्वी तेथे शिवराज राक्षेने राडा घातला होता. उपांत्य फेरीतल्या सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन त्याने आक्षेप घेतला होता. त्याने रागात पंचांना लाथ देखील मारली होती. या राड्यानंतर काही वेळानंतर अंतिम सामना सुरु करण्यात आला. अंतिम सामन्यादरम्यानही काही प्रेक्षकांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप करत तेथे नियंत्रण मिळवले.

Maharashtra kesari 2025 final match winner
GB Syndrome Outbreak: पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंखेत सातत्याने वाढ; रुग्णांची संख्या १५८ वर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com