
दिल्ली विधानसभा निवडणुकाजवळ येताच प्रचाराचा जोर वाढू लागलाय. सर्व राजकीय पक्ष विविध योजनांचा घोषणा करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर दिल्लीकर आता कोणाच्या हातात सत्ता देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचदरम्यान राजकीय पक्षांची धक-धक वाढवलीय. त्याच कारण म्हणजे दिल्लीत सत्ता परिवर्तन करण्यावरून जनतेत ५०-५० असं मत असल्याचं दिसतंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे.
जनता दिल्लीच्या गादीवर कोणत्या पक्षाला बसवणार हे मतदानानंतर कळेलच, पण त्याआधी आप, काँग्रेस आणि भाजपचं टेन्शन वाढलंय. दिल्ली परत काबीज करण्यासाठी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलाय. पण खरी चुरशीची लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात होणार आहे. दिल्लीकरांना सरकार बदलण्याची इच्छा आहे का या प्रश्नांचे उत्तर देताना दिल्लीकरांनी मात्र राजकीय पक्षांची धाकधूक वाढवलीय.
या प्रश्नावर ४३.९ टक्के लोकांनी मतदान करत सरकार बदलासाठी सहमती दर्शवलीय. एक फेब्रुवारीपर्यंतच्या ट्रॅकरनुसार या प्रश्नावर उत्तर देताना विद्यमान सरकारच्या कामावर आपण नाराज असल्याच म्हणत आपल्याला सरकार बदलण्याची इच्छा असल्याचं म्हटलंय. तर दिल्लीतील १०.९ लोकांनी सरकार बदलण्याच्या विरोधात आपलं मत मांडलंय. पण तेही विद्यमान सरकारच्या कामावर नाराज असल्याचं म्हणत आहेत.
तर ३८.३ टक्के लोकांना आपण सरकारच्या कामकाजावर नाराज नाहीत,त्यामुळे ते सरकारदेखील बदलू इच्छित नाहीत. बदल हवा असलेल्या लोकांमध्ये आणि बदल नसलेल्या लोकांच्या मतांमध्ये फारसं अंतर नाहीये. यामुळे दिल्लीतील राजकीय दंगल कमालीची रोमांचकारी होणार आहे.
एका महिन्यापूर्वी दिल्लीकरांनी या प्रश्नाचं उत्तर ४६.९ टक्के लोकांनी सरकार न बदलण्याचं मत मांडलं होतं. आता या मतांमध्ये घसरण झालीय. तर ४६.२ टक्के लोकांनी आपण विद्यमान सरकारवर नाराज असल्याचं आणि बदल आवश्यक असल्याचं म्हटलंय. तसेच २.७ टक्के लोकांनी विद्यमान सरकारला परत एकदा संधी द्यायला हवी असं म्हटलं होतं.
म्हणजेच काय साधारणपणे एका महिन्यात नाराज आणि बदल हवा असणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झालीय. तर नाराज असूनही बदल नको, असे म्हणणाऱ्यांमध्ये वाढ झालीय. दरम्यानदिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार जय भगवान उपकर यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केलेत. भाजप मुस्लीम मतदारांना बाहेर गावी पाठवत आहे. काल रात्री मतदारांना पोलिस संरक्षणात २० बसमधून अजमेरला पाठवले जात होतं. जेणेकरून त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही, असा दावा आपच्या उमेदावाराने केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.