Anna Hazare Criticized News : राजधानी दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवली आहे. ७० जागांपैकी भाजप तब्बल ४७ जागांवर आघाडीवर आहे, तर सत्ताधारी आपला फक्त २३ जागांवर आघाडी मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांची सत्ता जाणार आहे, स्पष्ट झालेय. अरविंद केजरीवाल यांनाही स्वत:च्या मतदारसंघातून पराभावाचा धक्का बसलाय. केजरीवाल यांचा पराभव झाल्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांच्या डोक्यात दारूची बाटली, पैसा आणि सत्ता गेली, त्यामुळेच पराभव झाल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.
दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल मान्य करणे गरजेचे आहे. स्वार्थ आला की डाऊन झाला. पक्ष आणि पार्ट्या हे फक्त सत्ता आणि पैसे मिळवण्यापुरत्या नाहीत. देशाची आणि समाजाची सेवा करण्यासाठी आहेत. पक्ष आणि पार्टीमध्ये पाऊले चुकले, त्यामुळे जनतेने नाकारले, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे.
जसी करणी असते तशीच भरणी असते. केजरीवाल यांच्यासोबत दहा वर्षांपासून बोललो नाही. डोक्यात सत्ता, पैसा, दारूची बाटली शिरली. मी गेले दहा वर्ष केजरीवाल यांच्याशी बोललो नाही. आचार विचार नीट ठेवा. सुरुवातीला नीट होता, पैसा आणि सत्ता डोक्यात शिरली, असे अण्णा हजारे म्हणाले.
पुन्हा सत्तेवर येतील का नाही? सांगता येत नाही. पण खूप वेळ लागेल. ज्या दिवशी त्यांनी पक्ष आणि पार्टी काढली तेव्हापासून मी अरविंद केजरीवाल याच्याशी बोललो नाही. पक्ष आणि पार्टी आपल्याला नको होतं, असे अण्णा हजारे म्हणाले. दरम्यान अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून १२०० मतांनी पराभवाचा धक्का बसलाय.
दिल्लीमध्ये आपला जोरदार धक्का बसलाय. ७० जागांवरपैकी दिल्लीत आपला फक्त २३ जागांवरच आघाडी मिळाली आहे. भाजपने ४७ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.