Delhi Airport Bomb Threat: मोठी बातमी! दिल्ली- पुणे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी.. प्रवाशांना खाली उतरवले; तपास सुरू

Delhi Pune Vistara Flight Bomb Threat: दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली.
Delhi Airport News
Delhi Airport NewsSaamtv
Published On

Delhi Airport News: दिल्ली विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. जीएमआर कॉल सेंटरला आज फ्लाइटमध्ये बॉम्बचा फोन आला. या धमकीनंतर विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी सुरू असून सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे.

Delhi Airport News
Indore Crime News: खळबळजनक! कुत्र्यांचे भांडण, मालकांची जुंपली.. सुरक्षा रक्षकाच्या बेछूट गोळीबारात दोघांचा मृत्यू; ६ जखमी

धमकीच्या फोनने खळबळ...

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले. जीएमआर कॉल सेंटरला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी करण्यात आली.

Delhi Airport News
Pune Crime News: बाप नाही तू तर हैवान! बलात्कारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा भोगली; घरी परतल्यावर पुन्हा पोटच्या मुलीवर अत्याचार

पोलिसांकडून तपास..

या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे सांगण्यात येत आहे . CISF आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जीएमआर कॉल सेंटरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. यानंतर, विस्ताराच्या फ्लाइटला आयसोलेशन बेमध्ये नेऊन तपास केला जात आहे. सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com