Crime News
Crime Newssaam tv

Pune Crime News: बाप नाही तू तर हैवान! बलात्कारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा भोगली; घरी परतल्यावर पुन्हा पोटच्या मुलीवर अत्याचार

Crime News: बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या नराधम बापाकडुन लेकीवर पुन्हा बलात्कार, बापाला अटक
Published on

Pune News: पुण्यातून पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण पुण्यातून संतापाची लाट उसळली आहे. (Latest Marathi News)

नराधम बापाने (Father) या आधी देखील आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यावर त्याला शिक्षा देखील झाली. शिक्षा भोगून परत आलेल्या बापाने पुन्ह एकदा आपल्या लेकरावर हात टाकला आहे. आंबेगाव तालुक्यात ही घृणास्पद घटना घडलीये. सदर व्यक्तीवर पून्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Crime News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : संभाजीनगर की बिहार? दिवसाढवळ्या लुटले व्यापाऱ्याला

अधिक माहिती अशी की, पोटच्या अल्पवयीन लेकीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगून पुन्हा घरी परतल्यावर त्या नराधम बापाकडून त्याच लेकीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. बापाच्या कृत्याला कंटाळून पीडित मुलीने पोलीसांत तक्रार दाखल करण्यात केली आहे. बलात्कारी बापाला पारगाव पोलीसांनी अटक केलीये. असे घृणास्पद कृत्य करणा-या बापाला जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी असा संताप आंबेगाव तालुक्यात व्यक्त होत आहे.

मुलाच्या उपचारासाठी केली पैश्याची मदत; मोबदला म्हणून विवाहितेवर अत्याचार

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. गोंदियामध्ये देखील तीन दिवसांपूर्वी एक विचित्र घटना समोर आली. महिलेच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने तिने उपचारासाठी जवळच्या काही व्यक्तींकडे पैशांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर दोघांकडून या महिलेवर दबाव टाकत अत्याचार करण्यात आलाय. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

Crime News
Nagpur Crime News: नागपुरात हत्येचा थरार! दोन मित्रांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com