Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : संभाजीनगर की बिहार? दिवसाढवळ्या लुटले व्यापाऱ्याला

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
money, Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
money, Chhatrapati Sambhaji Nagar Crime Newssaam tv

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात आज (गुरुवार) दिवसाढवळ्या व्यापा-याच्या डोळ्यात मिरची टाकून त्याला लुटण्याचा प्रकार घडला. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. (Maharashtra News)

money, Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
Pandharpur News : '...अन्यथा पंढरपूर दौ-यावर येणा-या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार'

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना बजाजनगर येथे घडली. एका व्यक्तीने व्यापा-याला बॅगेत पैसे आहेत, तुम्ही मला ट्रान्सफर करा मी तुम्हांला देईन असे म्हटले. मी पैसे ट्रान्सफर करताच संबंधिताने माझ्या डाेळ्यात मिरची पावडर फेकून मला लुटलं अशी तक्रार व्यापा-याने दिली आहे.

money, Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
3 Year Old Leopard Dies : ग्रामस्थांना दिलासा... शेत शिवारात फिरणा-या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

यावेळी व्यापा-याने मदतीसाठी हाक दिली. या घटनेनंतर काही नागरिकांनी संशयितास पकडले. ताेपर्यंत कूणी तरी पाेलिसांना बाेलावले हाेते. संबंधित संशयितास नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

संभाजीनगरचा बिहार हाेताेय का?

संभाजीनगरात पोलिसांचा धाक संपला आहे की काय असा प्रश्न पुन्हा एका चर्चेत आला आहे. आजच्या घटनेमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com