Nagpur Crime News: नागपुरात हत्येचा थरार! दोन मित्रांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

Nagpur Latest News: कारमधून आलेल्या ६-७ जणांनी दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaamtv
Published On

Nagpur Crime News: नागपुर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन मित्रांवर ७-८ जणांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर कारमध्ये आलेले हल्लेखोर फरार झाले. या भयंकर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime News
Sharad Pawar: आज बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार; 27 ऑगस्टला अजित पवारांची उत्तर सभा

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉप जवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला झाला. काल रात्री ( १६, ऑगस्ट) साडे नऊ वाजता ही धक्कादायक घटना घडली. राकेश मिश्रा (वय २७) व रवी जयस्वाल (वय २८) अशी हल्ला झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेत राकेश मिश्रा या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन्ही तरुण या भागात आरटीओ संबंधित कागदपत्रे गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे रात्री हे दोघेही बसस्टॉप जवळील पानटपरीवर बसले होते. यावेळी कारमधून आलेल्या ६-७ जणांनी दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये राकेश गंभीर जखमी होवून जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचविण्यासाठी बाजूला असलेल्या क्लिनिकमध्ये घुसला.

Nagpur Crime News
Ahmednagar Crime News: आधी झोपेत असलेल्या पत्नी आणि सासूची हत्या, नंतर जावयानेही संपवलं जीवन; घटनेनं अहमदनगर हादरले

हल्लेखोरांनी रुग्णालयाच्या काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण व डॉक्टरांसमोर त्यालाही गंभीर जखमी केले व कारमध्ये बसून फरार झाले. या हल्ल्यातील जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com