Indore Crime News: खळबळजनक! कुत्र्यांचे भांडण, मालकांची जुंपली.. सुरक्षा रक्षकाच्या बेछूट गोळीबारात दोघांचा मृत्यू; ६ जखमी

Firing After Argument Over Pet Dogs: वाद वाढल्यावर आरोपी घराकडे धावला आणि बंदुक घेऊन पहिल्या मजल्यावर पोहोचला आणि गोळीबार सुरू केला.
Indore Crime News
Indore Crime NewsSaamtv
Published On

Madhya Pradesh Crime News: कुत्र्याला फिरवण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाने बेछूट गोळीबार केल्याची घटना मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात घडली. या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News In Marathi)

Indore Crime News
Nandurbar Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला फरफटत नेले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू 

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पाळीव कुत्र्यांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने शेजाऱ्यांवर गोळीबार केल्याने दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. राजपाल राजावत असे आरोपीचे नाव असून तो बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो आणि शहरातील कृष्णा बाग कॉलनीत राहतो.

कृष्णा बाग कॉलनीत राहणाऱ्या राजपालचा त्याच्या कॉलनीतील काही शेजाऱ्यांसोबत पाळीव कुत्र्यांवरून वाद झाला. वाद वाढत गेल्यावर राजावत आपल्या घराच्या टेरेसवर गेला आणि त्याने खाली उभ्या असलेल्या लोकांवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात राहुल आणि विमल या दोघांचा मृत्यू झाला.

Indore Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime: इंस्टाग्रामवर मैत्री, फिरायला गेल्यावर काढले अश्लिल फोटो अन्.. अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजता आरोपी राजपाल कुत्र्याला फिरवत होता. याचवेळी त्याठिकाणी दुसरा कुत्रा आला आणि दोन्ही कुत्र्यांची मारामारी सुरू झाली. यावेळी राहुलच्या कुटुंबाने आक्षेप घेतल्यावर वादावादी झाली.

वाद वाढल्यावर आरोपी घराकडे धावला आणि बंदुक घेऊन पहिल्या मजल्यावर पोहोचला आणि गोळीबार सुरू केला. गोळीबारात राहुल आणि विमल यांना गंभीर अवस्थेत एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com