Cyclone Alert :  चक्रीवादळाचा इशारा, हिवाळ्यात पाऊस धुमाकूळ घालणार, या राज्यांना अलर्ट

Cyclone Senyar Alert: बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
Cyclone
Cyclonex
Published On
Summary
  • बंगालच्या खाडीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तासांत चक्रीवादळ सेनीयरमध्ये रूपांतर होण्याची शक्यता.

  • तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा.

  • महाराष्ट्रातील काही भागातही थंडी कमी होऊन तुरळक पावसाची शक्यता व्यक्त.

  • किनारपट्टी भागात ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज, प्रशासन सतर्क.

Cyclone Senyar News Update : बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळ्यात अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या दक्षिण किनारी जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडला आहे. पुढील चार दिवस काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब झाली आहे.

दोन दिवसांपासून तामिळनाडूच्या उत्तर आणि उत्तर किनारी जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले. २३ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २३ ते २५ नोव्हेंबर या काळात केरळमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २३, २४ नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशातील लक्षद्वीप, यानम, रायलसीमा आणि तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Cyclone
Local Body Election : बदलापुरात प्रचारसभेत राडा, दोन राजकीय पक्षांमध्ये जोरदार मारहाण | VIDEO

२५ नोव्हेंबर रोजी कोमोरनच्या खाडी भागात आणि श्रीलंकेजवळ आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तिरुनेलवेली जिल्ह्यातील नल्लुमुक्कू येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ओथू , कक्काची आणि मंजोलाई या ठिकाणीही पावसाने हजेरी लावली. तामिळनाडूमधील दक्षिण किनारपट्टीच्या भागात वादळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित तमिळनाडूमध्येही मान्सून सक्रिय आहे. तमिळनाडूच्या बहुतेक भागात आणि पुद्दुचेरी आणि कराईकल प्रदेशात पावसाने हजेरी लावली. रविवारी मलाक्का सामुद्रधुनी आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच प्रदेशात तीव्र झालेय.

Cyclone
EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

समुद्रसपाटीपासून ७.६ किमी पर्यंत हवेचा पट्टा पसरलेला आहे. सोमवारी तो पश्चिम-वायव्येकडे सरकेल आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्यात तीव्र होईल. पुढील ४८ तासांत ते पश्चिम-वायव्येकडे सरकत राहील आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर चक्रवाती वादळात रूपांतर होईल. दक्षिण किनारपट्टी कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तेनकासी आणि थुथुकुडी जिल्ह्यांवरील काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल प्रदेशातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू किनारपट्टी, मन्नारची खाडी आणि कोमोरिन प्रदेशात ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने आणि ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Cyclone
२८ वर्षाच्या महिला डॉक्टरने ९ व्या मजल्यावरून उडी मारली, महिन्याभरात होणार होतं लग्न, नेमकं झालं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com