Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं

Crude Oil Price Surges: सौदी अरेबियाने पूर्व-पश्चिम पाइपलाइन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाइपलाइवर ड्रोनने हल्ला करण्यात आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं
Crude Oil Price SurgesSaam Tv
Published On
  1. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाची पाइपलाइन बंद केली

  2. सौदीने पाइपलाइन बंद केल्याने भारतावर परिणाम होणार

  3. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या पुढे गेल्या

  4. सौदी अरेबियावरील ड्रोन हल्ल्यामुळे भारताचे टेन्शन वाढले

  5. भारतात पेट्रोल- डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता

भारताचे टेन्शन वाढलं आहे. सौदी अरेबियाने कच्चा तेलाचा पुरवाठा करणारी पाइपलाइन बंद केली. त्यामुळे आता नवं संकट आलं आहे. भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. गुरूवारी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०९ डॉलरवर पोहोचल्या होत्या. अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आधीच बंद आहे. अशात आता सौदी अरेबियाने पूर्व-पश्चिम पाइपलाइन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पाइपलाइन होर्मुझला वळसा घालून पश्चिम किनारपट्टीवरील यान्बू बंदरापर्यंत तेल वाहून नेत होती. त्याठिकाणावरून हे तेल भारत आणि इतर आशियाई देशांमध्ये पाठवले जात होते. ड्रोन हल्ल्यानंतर ही पाइपलाइन बंद करण्यात आली आहे. ही पाइपलाइन बंद करण्यात आल्यामुळे भारतासह अनेक आशियाई देशांच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

सौदी अरेबिया हा भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे. इराण युद्धापूर्वी सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सौदी अरेबियातून होणारा कच्चा तेलाचा दैनंदिन पुरवठा ७,४३,००० बॅरल होता. जो फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान ४,४०,००० बॅरलपर्यंत घसरला. अमेरिका-इराण युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियामधील कच्च्या तेलाचे उत्पादन ३६ वर्षांतील निच्चांकी पातळीवर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्टमध्ये निर्यातीतही ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं
Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहू जहाजांची वाहतूक थांबवली आहे. सौदी अरेबिया आपल्या तेलाच्या निर्यातीसाठी पूर्व-पश्चिम पाइपलाइनचा वापर करत आहे. पण आता ड्रोन हल्ल्यामुळे या पाइपलाइनचे देखील मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा हा पर्यायी मार्गही संकटात सापडला आहे. एका ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने सुमारे १,२०० किलोमीटर लांबीची पूर्व-पश्चिम पाइपलाइन तात्पुरती बंद केली. खबरदारीचा उपाय म्हणून ही पाइपलाइन बंद करण्यात आली असल्याची माहिती सौदी ऊर्जा मंत्रालयाने दिली.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

गुरुवारी सकाळी सौदी अरेबियातील रियाध आणि मदिना परिसरात भारताला तेलाचा पुरवठा करणाऱ्या या पाइपलाइनला लक्ष्य करण्यात आले. मदिनाच्या दक्षिणेकडील पाइपलाइनच्या एका भागातून काळा धूर निघताना दिसत असल्याचे फोटो समोर आले आहेत. या ड्रोन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि पाइपलाइनचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. या नुकसानीचा अंदाज सध्या घेतला जात आहे. या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. बगदाद आणि रियाध या दोन्ही देशांनी सांगितले की, हा हल्ला इराकमधून झाला होता. ज्याठिकाणी इराण-समर्थित सशस्त्र गट सक्रिय आहेत.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं
Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com