Crime News: ज्याच्या विरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल केला, त्याच्यासोबतच महिलेने ठोकली धूम

UP Crime News: आश्‍चर्याची बाब म्हणजे घटनेच्या वेळी महिलेसोबत तिचा पती आणि कुटुंबीयही उपस्थित होते.
faridpur police station, bareilly
faridpur police station, bareillyfaridpur police station, bareilly
Published On

Woman Ran Away With Rape Accused : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एक महिला अशा आरोपीसोबत फरार झाली, ज्याच्या विरोधात ती गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली होती. आश्‍चर्याची बाब म्हणजे घटनेच्या वेळी महिलेसोबत तिचा पती आणि कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी महिलेला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिने त्यांचे ऐकले नाही आणि पोलिस स्टेशनच्या गेटमधूनच आरोपी तरुणासोबत दुचाकीवर निघून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या एका मुलीचे 2 वर्षांपूर्वी बदायूंतील दातागंज भागात लग्न झाले होते. सासरच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने फसवणूक करून महिलेचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. हा प्रकार सासरच्या मंडळींना समजताच त्यांनी महिलेला शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या महिलेने आपल्या माहेरी जाऊन सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

faridpur police station, bareilly
Noida Lighting Truss Falls: फॅशन शोदरम्यान लाइटिंगचा ट्रस पडल्याने मॉडेलचा मृत्यू, फिल्मसिटीमध्ये घडली घटना

मुलीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालकांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या सासरच्या मंडळींनाही फोन केला. अश्‍लील फोटो प्रकरणी महिलेने पती, सासरे आणि आई-वडिलांसह आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी फरीदपूर पोलिस स्टेशन गाठले. आरोपी तरुण तिथे पोहोचल्यावरच महिलेने आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार देखील दाखल केली होती. परंतु तिच्या घरच्या लोकांना आणि पोलीसांना काही कळण्याच्या आत महिला आरोपी तरुणाच्या दुचाकीच्या मागे बसून महिला पळून गेली. (Breaking News)

faridpur police station, bareilly
Success Story: हॉटेलमध्ये करायची वेटरचं काम, आज चालवतेय 2 लाख कोटींची कंपनी; कोण आहेत यामिनी रंगन?

नवरा ओरडत राहिला, महिला थांबली नाही

घटनास्थळी उपस्थित सर्वजण महिलेकडे बघतच राहिले. पती आणि मामाने महिलेला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही. हे दृश्य पाहून पोलीस ठाण्यात उपस्थित सर्व पोलीस कर्मचारीही अचंबित झाले. महिलेच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करत दुचाकीचा लांबपर्यंत पाठलाग केला, मात्र आरोपी तरुण आणि महिला पळून जाण्यात यशस्वी झाजले. ते दोघेही फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मामाने आरोपी तरुणाविरुद्ध फिर्याद दिली आहे. तरुणाने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com