देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात मागच्या २४ तासांत ७९७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाभरात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा ४,०९१ वर आला आहे.
केरळ-२, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी १ रुग्णाचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे (Corona) एकूण मृत्यूंची संख्या ही ५,३३, ३५१ वर पोहोचली आहे.
भारतात SARS-CoV-2 कन्सोर्टियमच्या आकडेवारीनुसार, कोवीड (covid)-१९ चा सब व्हेरिएंट JN.1 ची आतापर्यंत १५७ रुग्ण आढळून आली आहे. ज्यात केरळमध्ये सर्वात जास्त ७८ रुग्ण तर गुजरातमध्ये ३४ प्रकरणे आढळून आले आहे. हा डेटा गुरुवारी रात्री अपडेट करण्यात आला आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी सांगितले की, नव्या व्हेरिएंटमुळे निदान झालेली ५० वर्षांची व्यक्ती बरी झाली असून सध्या एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाहीये. अशातच मागील काही आठवड्यांपासून कोविडच्या केसेसमध्ये (cases) वाढ नोंदवण्यात आली आहे.
बंगालमध्ये गुरुवारी गेल्या २४ तासांत राष्ट्रीय स्तरावर १४ नवीन प्रकरणे आढळून आली आहे. भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियमच्या नुसार केरळ (७८), गुजरात (३४), गोवा (१८), कर्नाटक (८), महाराष्ट्र (७), राजस्थान (५), तामिळनाडू (४), तेलंगणा (२) आणि दिल्ली (१) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
1. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे पाऊल
राज्यात कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ७ सदस्यी टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्कफोर्सच्या मदतीने राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.