देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे आढळून येत आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, रविवारी कोरोनाचे ६५६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,०५४ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे केरळमधली आहे.
भारतात कोरोनाच्या नवीन सब-व्हेरिएंट JN.1 च्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. देशात JN.1 च्या या नव्या व्हेरिएंटची ६३ प्रकरणे नोंदवली आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना चाचण्या वाढवण्याचा आणि इन्फ्लूएंझा सारख्या रोगांवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
1. Covid -19 Jn 1 लक्षणे (Symptoms) कोणती?
तज्ज्ञांचे मत आहे की, कोविड -१९ च्या वेगवेगळ्या प्रकारामुळे लक्षणांमध्ये सौम्य बदल दिसू शकतात. युनायटेड किंगडमच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोविड-१९ ची नवीन लक्षणे कोणती ती जाणून घेऊया
नाक गळती
सर्दी
खोकला
डोकेदुखी
अशक्तपणा आणि थकवा
स्नायू दुखणे
घसा खवखवणे
निद्रानाशाची समस्या
चिंता
हिवाळ्यात श्वसनांच्या संबंधित रोगांची लक्षणे पाहायला मिळतात. खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही सर्वात सामान्य लक्षणे सांगण्यात आले आहे.
2. कोविडमधून बरे झाल्यानंतर लक्षणे काय?
मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर देखील ही लक्षणे कायम राहातात. यामध्ये डोकेदुखी, थकवा, श्वास लागणे ही लक्षणे दिसतात. हा आजार किमान ४ ते ६ आठवडे राहू शकतात. यामध्ये कोणती लक्षणे दिसून येतात. जाणून घेऊया
थकवा
ब्रेन स्ट्रोक
चक्कर येणे
पोटाचे विकार
अस्वस्थता
चव किंवा वास न येणे
सतत तहान लागणे
खोकला
छातीत दुखणे
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.