Corona JN.1 Veriant Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आवाज जाण्याचा धोका; संशोधनात धक्कादायक खुलासा

Corona JN.1 Veriant Update : कोरोनामुळे शारीरिक समस्या अनेक प्रकारे वाढू शकतात, त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोविड-19 मुळे व्होकल कार्ड पॅरालिसीसची एक केस समोर आली आहे.
Corona virus
Corona virusSaamTv
Published On

Corona News Update :

कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत अनेक गंभीर आरोग्य समस्या समोर आल्या आहेत. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे भारतासह चीन-सिंगापूर अनेक देशांमध्ये कोरोनाच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे शारीरिक समस्या अनेक प्रकारे वाढू शकतात, त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की चव आणि वासानंतर आता कोरोना संसर्ग आवाज देखील हिरावून घेऊ शकतो. कोविड-19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसीसची एक केस समोर आली आहे. (Latest News)

Corona virus
Covid19: कोरोनाची लाट परत का आली? WHOनं सांगितला कोविडपासून वाचण्याचा उपाय

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स डोळे आणि कान स्पेशालिस्ट रुग्णालयातील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित किंवा न्यूरोपॅथिक गुंतागुंत देखील निर्माण होऊ शकते. यामुळे व्होकल कॉर्डला पॅरालिसीस होतो, ही बाब समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर्नल पेडियाट्रिक्समधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे केवळ चव आणि वासच नाही तर घशाचा आवाज देखील जाऊ शकतो. याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस म्हणतात.

Corona virus
Corona Variant JN.1 : कोरोनाची चौथी लाट येणार?, पुढचे २-३ आठवडे महत्वाचे; तज्ज्ञांचे मत काय?

देशभरात गेल्या 24 तासात 752 रुग्णांची नोंद

देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यावर्षी 21 मे नंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये केरळमध्ये दोन आणि राजस्थान-कर्नाटकमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3420 वर पोहोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com