Himani Narwal Congress Leader : हरियाणामध्ये रोहतक येथील सांपला बस स्टँडजवळ काँग्रेसच्या महिला नेत्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा हातावर मेहंदी असल्याचे दिसले. हिमानी नरवाल रोहतकमधील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जात होत्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत हिमानी नरवाल सहभागी झाल्या होत्या. हिमानी नरवाल यांचा मृतदेह आढळल्यानंतर रोहतकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तात्काळ तपास सुरूवात केला आहे.
हातावर मेहंदी, गळ्यात काळी ओढणी अन्....
सांपला बस स्टँडजवळ सुटकेसमध्ये हिमानी नरवाल यांचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हिमानी यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी संपाला बस स्टँडच्या जवळ ही सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुटकेसमध्ये मृतदेह पाहिल्यानंतर पोलीसही चक्रावले. हिमानीच्या हातावर मेहंदी होती. गळ्यात काळी ओढणी, पांढऱ्या रंगाचा टॉप अन् लाल पँट होती. मृतदेह पाहिल्यानंतर गळा दाबून हत्या केली, त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी -
शनिवारी सकाळी सुटकेसमध्ये मृतदेह आढळला, पण त्याची ओळख पटत नव्हती. सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फोटो व्हायरल झाले. आमदार बीबी बत्रा यांनी मृतदेहाची ओळख पटवली, हिमानी नरवाल असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रामध्ये सहभागी झाल्याचे आणि काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या असल्याचेही सांगितले. आमदार बीबी बत्रा यांनी हिमानी नरवाल हत्याकांडाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी याप्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. हिमानीला न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी रोहतकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कऱण्यात येत आहे.
वडिलांची आत्महत्या, भावाची हत्या -
संपाल पोलिस स्टेशनचे अधिकारी विजेंद्र सिंह यांनी हिमानी नरवाल यांच्या हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली, त्याशिवाय तात्काळ चौकशीला सुरूवात केली. प्राथमिक तपासानुसार, गळा दाबून हत्या झाली असावी असे त्यांनी सांगितेल. मिळालेल्या माहितीनुसार, हिमानीच्या वडिलांनी काही दिवसांपासून आत्महत्या केली होती. तर तिच्या भावाची हत्या झाली होती. रोहतक पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.