Crime News: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महिला काँग्रेस नेत्याची हत्या, सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

Congress Leader Killed: बस स्थानकाच्या एका भिंतीजवळ काळ्या रंगाची सुटकेस मध्ये काँग्रेस नेत्याचा मृतदेह आढळून आलाय. एका व्यक्तीला सुटकेसचा संशय आला त्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली.
Haryana Crime News
Congress Leader Killed
Published On

हरियाणामध्ये एका महिला काँग्रेस नेत्याची हत्या झालीय. महिला नेत्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याने खळबळ माजलीय. हरियाणामधील सांपला बस स्थानकाजवळील एका उड्डाणपुलाच्या नजीक एका सुटकेसमध्ये महिला नेत्याचा मृतदेह आढळलाय. या महिला नेत्याचं नाव हिमानी नरवाल असून त्या राहुल गांधींच्या भारत जोडो आंदोलनात देखील दिसल्या होत्या.

पक्षात खूप सक्रिय होत्या. त्यांच्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपासासाठी एक उच्चस्तरीय चौकशी स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. रोहतकचे काँग्रेस आमदार भारतभूषण बत्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. बात्रा यांनी सांगितले की हिमानी नरवाल या काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या.

Haryana Crime News
Nandurbar News : नामांकित शाळेत विद्यार्थिनीने आयुष्याची दोरी कापली, आई-वडिलांचा शाळेच्या आवारात आक्रोश

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, हिमानी नरवाल हत्या प्रकरणाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. एका मुलीची अशा प्रकारे हत्या होणे आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडणे हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे.

सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

संपाला बस स्थानकाच्या भिंतीजवळ एका व्यक्तीला काळ्या रंगाची सुटकेस पडलेली दिसली. सुटकेस पाहून या व्यक्तीला संशय आला, त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

Haryana Crime News
Deepak Badgujar MCOCA case: दीपक बडगुजरसह ५ जणांना दिलासा, नाशकातील 'त्या' गोळीबार प्रकरणातील मकोकाला स्थगिती

पोलिसांना याची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सुटकेस उघडली. त्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सांपला येथे सापडलेल्या मृतदेह रोहतक येथील 23 वर्षीय हिमानी नरवाल हिचा असल्याची ओळख पटली. हिमानी नरवाल यांच्या हातावर मेहंदी लावली होती. बलात्कारानंतर हिमानी यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तवलाय.

पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण केले, त्यांनी पुरावे गोळा केलेत. पोलिस आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. सांपला पोलीस ठाण्याचे प्रभारी बिजेंद्र यांनी सांगितले की,प्राथमिक तपासात हिमानी यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. त्यांच्या गळ्यात एक ओढणी गुंडाळलेली आढळून आली.फॉरेन्सिक टीमने सुटकेस आणि कपड्यांचे नमुने घेतले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय.

काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय

हिमानी नरवाल या काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या होत्या. हिमानी नरवाल रोहतकच्या विजय नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होत्या. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. तर आई दिल्लीत राहते. हिमानी नरवाल या काँग्रेसच्या सुप्रसिद्ध युवा नेत्या होत्या. अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही त्या सहभागी झाल्या होत्या. पक्षाच्या इतर कार्यक्रमांमध्येही त्या दिसली होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com