शिवसेना ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना दिलासा मिळाला आहे. दीपक बडगुजर याची मकोका गुन्ह्यातून सुटका झाली आहे. दीपक बडगुजर यांच्यासह पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून दिलासा मिळाला आहे. सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी ६ जणांना दिलासा मिळाला आहे.
सिडकोतील उपेंद्रनगर येथे १४ फेब्रुवारी २०२२ रोजी अॅड. जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता. घटनेच्या २ वर्षांनी पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत ६ संशयितांना अटक केली. यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर हा मुख्य सुत्रधार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
यात एकूण ५ जणांवर मकोकानुसार कारवाई सुरू झाली. पोलिसांनी त्यानंतर मकोकानुसार तपास करत दोषारोपपत्र अपर पोलीस महासंचलकांकडे पाठवले होते. मात्र, त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानं मकोकास स्थगिती मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.