Mallikarjun Kharge: RSS प्रमुख मोहन भागवतांना देशात फिरणं मुश्कील होईल; 'स्वातंत्र्या'च्या विधानावरून काँग्रेसचा इशारा

Mallikarjun Kharge Slams Mohan Bhawgat : अयोध्येत झालेल्या रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठाची तिथी 'प्रतिष्ठा द्वादशी' च्या रुपात साजरी केली जाईल, असं विधान आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge Slams Mohan BhawgaSaam Tv
Published On

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आमने-सामने आले आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या विधानावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जबर टीका केलीय. मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल करत खरगेंनी त्यांना थेट इशारा दिलाय. जर मोहन भागवत अशाचप्रकारे विधान करत राहिले, तर त्यांना देशात फिरणं अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिलाय. ते काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना मोहन भागवत यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना खरगे म्हणाले, आरएसएस आणि भाजपच्या लोकांना स्वातंत्र्य १९४७ मध्ये मिळवलेले आठवत नाही, कारण त्यांच्या वैचारिक पूर्वजांचे स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नव्हते.

Mallikarjun Kharge
Mohan Bhagvat : 'आरएसएस नसते, तर हिंदूंना ..' , सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मोहन भागवत यांनी सोमवारी अयोध्यामध्ये स्वातंत्र्याविषयी विधान केलं होतं. रामलला यांची प्राण प्रतिष्ठेचा दिवस हा 'प्रतिष्ठ द्वादशी' च्या रुपात साजरी केली जाईल. कारण अनेक वर्षांपासून शत्रूंचे आक्रमण झेलणाऱ्या देशाला खरं स्वातंत्र्य त्याच दिवशी मिळालं. भागवत यांच्या विधानावरून खरगेंनी त्यांच्यावर हल्लाबोल करत म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते ते स्वीकारत नाहीत ही शरमेची बाब आहे.

Mallikarjun Kharge
Rahul Gandhi: RSSची विचारसरणी असलेल्यांना पक्षातून काढावं लागेल: राहुल गांधी

आरएसएस आणि भाजपचा उल्लेख करताना खरगे म्हणाले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी कधी संघर्ष केला नाही. ते कधी तुरुंगातही गेले नाहीत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्याविषयी माहिती नाहीये. आमचे लोक लढले, प्राण गमावले म्हणूनच आम्हाला स्वातंत्र्य आठवतं. भागवत यांच्या विधानाचा आपण निषेध करतो आणि जर ते असेच विधान करत राहिले तर त्यांना हिंदुस्तानात हिंडणं-फिरणं अवघड होईल. काँग्रेसच्या नव्या कार्यालयाविषयी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले ही आनंदाची गोष्ट आहे की, कार्यालय तेथेच बनत आहे.

येथे कार्यालय बनावे असा आमच्या प्रमुखांना वाटत होतं त्याच ठिकाणी ते बनवलं जात आहे. काँग्रेसचे मुख्यालय देशासाठी लोकशाहीची एक शाळा आहे. दरम्यान खरगे यांच्याआधी राहुल गांधी यांनीही भागवत यांच्या विधानावर टीका केली होती. भागवत जे बोलले ते देशद्रोहाच्या बरोबरीचे आहे, कारण त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की, संविधान बेकायदेशीर आहे. इंग्रजांविरुद्धचा लढा हा बेकायदेशीर आहे. जर हे दुसऱ्या कोणत्या देशात असं कोणी बोललं असतं तर आतापर्यंत त्यांच्याविरोधात खटला चालवला गेला असता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com